logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे लोकार्पण नांदेड दि. 1 मे :-महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय (Magnetic Resonance Imaging) मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सुविधेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात न जाता, शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील एमआरआय तपासणी सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले , अॅड. किशोर देशमुख इत्यादी प्रमुख लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे हा मुख्य उद्देश आहे. या नवीन MRI मशीनमुळे रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य आहे. तसेच आजपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. सदर एमआरआय हे मशीन उच्च क्षमतेचे असून यामुळे मेंदू, मणका, सांधे आणि शरीरातील इतर अंतर्गत भागांचे अत्यंत अचूक निदान (Imaging) करणे शक्य होईल. खाजगी लॅबमध्ये 5र ते 10 हजार रुपये खर्च येणारी ही तपासणी जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. हनुमंत जाधव, डॉ. राष्ट्रपाल अवसरे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

20 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
20 hrs ago
ffeda7d7-fbbc-45c7-93e4-03a45bb34a96

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे लोकार्पण नांदेड दि. 1 मे :-महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय (Magnetic Resonance Imaging) मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सुविधेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात न जाता, शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील एमआरआय तपासणी सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले , अॅड. किशोर देशमुख इत्यादी प्रमुख लोकप्रतिनिधी

413d1e91-90f6-45e0-ac6c-9d914f5b7478

यांची उपस्थिती होती. या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे हा मुख्य उद्देश आहे. या नवीन MRI मशीनमुळे रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य आहे. तसेच आजपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. सदर एमआरआय हे मशीन उच्च क्षमतेचे असून यामुळे मेंदू, मणका, सांधे आणि शरीरातील इतर अंतर्गत भागांचे अत्यंत अचूक निदान (Imaging) करणे शक्य होईल. खाजगी लॅबमध्ये 5र ते 10 हजार रुपये खर्च येणारी ही तपासणी जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. हनुमंत जाधव, डॉ. राष्ट्रपाल अवसरे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shaikh Rafik Qureshi
    1
    Post by Shaikh Rafik Qureshi
    user_Shaikh Rafik Qureshi
    Shaikh Rafik Qureshi
    हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दिनी ठाणेदार विकास दांडे यांनी एकात्मतेचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवला. वडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास फुलुके हे अवघ्या एक महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी फुलुके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून फुलुके यांना मानवंदना देण्यात आली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दिनी  ठाणेदार विकास दांडे यांनी एकात्मतेचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवला. वडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास फुलुके हे अवघ्या एक महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी फुलुके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून फुलुके यांना मानवंदना देण्यात आली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    1 hr ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.