उन्हाळ्यात जनावरांवर विषबाधेचे संकट; पशुपालकांनी वेळीच घ्या खबरदारी! उन्हाळ्यात जनावरांवर विषबाधेचे संकट; पशुपालकांनी वेळीच घ्या खबरदारी! बुलढाणा - उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता आणि पचनाचे विकार यांसोबतच आता जनावरांमध्ये विषबाधेच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यास ही विषबाधा जनावरांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पशुपालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होत असल्याने जनावरे उपलब्ध असलेल्या कोणत्याही वनस्पती खातात. धोतरा, आकोडा, करट, रानमेथी यांसारख्या विषारी वनस्पतींचे सेवन केल्याने जनावरांना गंभीर विषबाधा होऊ शकते. याशिवाय कीटकनाशकांची फवारणी केलेला चारा, रासायनिक खते, कुजलेला किंवा बुरशी लागलेला खाद्यपदार्थ यामुळेही जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार, तोंडातून फेस येणे, लाळ गळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पोट फुगणे, बेचैनी, जुलाब, स्नायूंना कंप सुटणे अशी लक्षणे दिसल्यास विषबाधेचा धोका संभवतो. काही वेळा अचानक मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विषबाधा टाळण्यासाठी स्वच्छ व दर्जेदार चारा देणे, गोठ्याभोवती स्वच्छता राखणे, कीटकनाशके सुरक्षित ठेवणे, विषारी वनस्पती नष्ट करणे आणि जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. जनावरे ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. योग्य खबरदारी आणि वेळेवर उपचार यामुळे विषबाधेचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

- maje gavat Aaj gatna jali aamcha gavat ek ghatna jali gaikar wali kaarvayi jalim I1
- प्रहार-शिवसेनेची नवी रणनीती ठरली ; . शिवसेनेचे आमदार बच्चू कडूं1
- सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील मराठी भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठीत शपथ घेतल्याने त्यांच्या भाषणाची आणि व्हिडीयची सर्वत्र चर्चा होत असून, तो प्रचंड व्हायरल झाला आहे.1
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.1
- छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अरुणाय शिव मंदिरात पूजा अर्चना केली. यावेळी गीता मनीषी स्वामी ज्ञानानंदजी महाराज व इतर मान्यवर त्यांच्यासोबत उपस्थित होते.1
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1