हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli

- आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!1
- गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.2
- *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर येथे एक महिना पुरेल एवढा धान्य व किराणा साठा भेट देत निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि आधाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले. गेल्या चार वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार, वयोवृद्ध, भिक्षा मागणारे आजी-आजोबा तसेच डिपेंडंट व्यक्तींसाठी निःस्वार्थपणे मोफत सेवा दिली जात आहे. अनेकांना जिथे स्वतःच्या कुटुंबाकडून आधार मिळत नाही, अशा वृद्धांसाठी हा आश्रम मायेची सावली बनला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजातील गरजू, निराधार आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी हातभार लावणे हीच खरी मानवसेवा आहे. संघर्ष, समर्पण, अभ्यास आणि माणुसकीचा अखंड वाहणारा झरा… म्हणजे अनिलभाऊ - प्रशांत ढोरे पाटील केमिस्ट विश्वातील लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर! काही व्यक्ती या केवळ व्यक्ती नसतात… त्या एक विचार असतात… एक प्रेरणा असतात… एक चळवळ असतात… आणि हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देणारं विद्यापीठ असतात…! केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर हे असंच एक नाव… ज्यांचा उल्लेख झाला की संघर्षालाही बळ मिळतं, अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धैर्य निर्माण होतं आणि हजारो केमिस्ट बांधवांच्या डोळ्यात विश्वासाची नवी पहाट उगवते…! गेली अनेक दशके त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य केमिस्ट, फार्मासिस्ट आणि औषध व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी समर्पित केलं आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात निर्भीड भूमिका घेत त्यांनी केमिस्ट चळवळीला नवं बळ दिलं. ई-फार्मसीविरोधातील संघर्ष असो किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कासाठीचा लढा प्रत्येक वेळी अनिलभाऊ खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अभ्यासाची ताकद आहे… प्रत्येक भाषणात सत्याची धार आहे… प्रत्येक निर्णयात संघटनप्रेम आहे… आणि प्रत्येक कृतीत कार्यकर्त्यांविषयीची अपार आत्मीयता दडलेली आहे…! यावेळी केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे, सचिव विनोदजी नागवाणी, जिल्हा प्रतिनिधी सुनीलजी पारसकर, उपाध्यक्ष बद्रीभाऊ पानगोळे, जयंत शर्माजी, सुचित भराड, अभिमन्यू जगताप आदी उपस्थित होते. तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेसाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन भरीव मदत करावी, असे आवाहन केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी केले. तर कुठेही निराधार, बेघर वृद्ध, मुलं-मुली किंवा नातेवाईक असूनही सांभाळ केला जात नसलेल्या वृद्धांनी 8855850378 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.2
- अकोल्यातील डाबकी रोडवरील रावनगर मांगे नाल्यावर बोगस बांधकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाल्यात घाण पाणी तसेच खाली मास काँक्रिटीकरण न करताच बांधकाम केल्याने तो पडला आहे. नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.4
- जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त... जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड... घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील शेतकऱ्याने आपली एक एकरातील मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली... एक एकरातील मोसंबीची 200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...1
- बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.1
- Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?1
- येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1