*येरगी ग्राम पंचायत चे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* *#जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन* देगलूर: येरगी ग्राम पंचायत द्वारे करण्यात आलेल्या विविध बहुआयामी कार्य हे निश्चितच उल्लेखनीय असून ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन नांदेड चे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तालुक्यातील येरगी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 'जलतारा' प्रकल्प उद्घाटन सोहळ्यात केले. सदरील जलतारा प्रकल्प उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सरस्वती च्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे होते तर व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी अनुप पाटील,उपजिल्हाधिकारी हणमंत कोळेकर, जिल्हा परिषद नांदेड चे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, मरखेल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हुंडेकर , छत्रपती संभाजी नगर पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ.कामाजी डक ,कृषी अधिकारी संजय लहाने,सहायक कार्यक्रम अधिकारी चेतन जाधव,अनिल सगर,दत्तात्रयं कुरुंदे,विशाल मिसे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संतोष पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गावच्या विकासाचा पाढा वाचला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे पुढे म्हणाले की मराठवाड्याच्या अगदी कोपऱ्यातील तेलंगणा सीमेवरील येरगी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत हे प्रत्येकांसाठी गौरवाची बाब आहे. येथील बालिका पंचायत राज चे उल्लेखनीय कार्य असो की स्वच्छता अभियान अतिशय सुंदर काम चालू आहे. तसेच ऐतिहासिक चालुक्य कालीन संपदा जपण्याचे कार्य ग्रामपंचायतीने कॉफी टेबल बुक प्रकाशित करून केले आहे. बहुधा कॉफी टेबल बुक प्रकाशित करणारे देशातील हे पहिलेच ग्राम पंचायत आहे. गावातील स्वच्छता,कन्या भरून हत्या विरोधी कार्य आधीचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी जलतारा प्रकल्प यशस्वी करून भूजलस्तर वाढवण्याचे कार्य व्हावे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोलार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण,रेन वॉटर हार्वेस्टिंग,जलतारा प्रकल्प याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात बालिका पंचायत राज सचिव महादेवी दाणेवार हिने बालिका पंचायत राज मार्फत गावात चालू असलेल्या विविध कार्याची माहिती आपल्या मनोगतातून दिली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी गावातील चालुक्यकालीन बारव, विहीरी, सरस्वती मंदिर,केशवेश्वर मंदिर आदींची पाहणी करून चालुक्य कालीन संपदा जपण्याचे कार्य चांगले चालू असल्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील जाधव यांनी केले तर आभार राजेश तोटावाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील,सर्व ग्राम पंचायत सदस्य,बालिका पंचायत राज समितीच्या सर्व पदाधिकारी,सर्व ग्रामस्थांनी परिश्रम केले.

- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह3
- नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन1
- Post by YUVA JALNA NEWS1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1