अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणास तीव्र विरोध... अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणास तीव्र विरोध अर्जुनी मोरगाव : अनुसूचित आरक्षणाचे करण्याच्या जातीतील उपवर्गीकरण हालचालींना वेग आले आहे. याविरोधात अर्जुनी मोरगाव येथे संतापाची लाट उसळली असून, या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार अनुसूचित जाती हा एक एकजिनसी वर्ग आहे. मात्र, उपवर्गीकरणाच्या नावाखाली या समाजाचे आरक्षण पूर्णपणे संपविण्याचे मोठे कारस्थान रचले जात आहे, असा खळबळजनक आरोप अनुसूचित जाती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केला आहे. या संदर्भात नायब तहसीलदारांमार्फत राज्याचे प्रधान सचिव आणि 'बार्टी'चे महासंचालक यांना निवेदन पाठविण्यात आले. अनुसूचित जातीतील विशिष्ट जातींना आरक्षणात प्राधान्य देताना इतर जातींचे पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचा कोणताही ठोस 'इम्पिरीकल डाटा' किंवा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. तसेच, न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी दविंदर सिंग प्रकरणात दिलेल्या निकालातील सूचनांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनंत बदर समितीचा अहवाल मुळातच रद्दबातल ठरण्यास पात्र आहे. शिष्टमंडळाने सरकारला काही प्रमुख सूचना केल्या आहेत, ज्यामध्ये अनंत बदर समितीचा अहवाल अनुसूचित जातीतील ५९ जातींना विश्वासात न घेता तयार केल्यामुळे तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा अहवाल जनतेसमोर ठेवून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी किमान एक महिन्याचा वेळ द्यावा आणि त्यानंतर जाहीर सुनावणी घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान प्रत्येक जातीच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधींची नियुक्ती करावी आणि त्यांच्या मतानुसारच निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. सरकारने या आक्षेपांची दखल न घेतल्यास न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या शिष्टमंडळात अॅड. मुनेश्वर शहारे, अशोक खोब्रागडे, सोनु कऱ्हाडे, धनंजय गोंडाने, युवराज कांबळे, रमेश शहारे, विनोद खोब्रागडे आणि संजय ब्राह्मणकर यांचा समावेश होता.

- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1