बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीची बाइक रॅली; खासदार भास्कर भगरे रॅलीत सहभागी बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आज जोरदार बाइक रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी स्वतः बाइक रॅलीत सहभागी होत बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. रॅलीत पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, मुन्ना अंसारी, महिला जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील वाढती बेरोजगारी, युवकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, रखडलेल्या शासकीय भरती प्रक्रिया आणि रोजगारनिर्मितीच्या प्रश्नांवर यावेळी राष्ट्रवादीकडून शासनाला लक्ष्य करण्यात आले. युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या भवितव्याला दिशा देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, रोजगाराच्या प्रश्नासोबतच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही रॅलीतून आवाज देण्यात आला. कांद्याला योग्य भाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरू झालेली बाइक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे’, ‘कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर बेरोजगार युवक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोजगार, युवकांचे हक्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनाची धार अधिक तीव्र केली असून, युवक आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आगामी काळातही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीची बाइक रॅली; खासदार भास्कर भगरे रॅलीत सहभागी बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आज जोरदार बाइक रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी स्वतः बाइक रॅलीत सहभागी होत बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. रॅलीत पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे,
जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, मुन्ना अंसारी, महिला जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील वाढती बेरोजगारी, युवकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, रखडलेल्या शासकीय भरती प्रक्रिया आणि रोजगारनिर्मितीच्या प्रश्नांवर यावेळी राष्ट्रवादीकडून शासनाला लक्ष्य करण्यात आले. युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या भवितव्याला दिशा देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी
केली. दरम्यान, रोजगाराच्या प्रश्नासोबतच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही रॅलीतून आवाज देण्यात आला. कांद्याला योग्य भाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरू झालेली बाइक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे’, ‘कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून
सोडला. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर बेरोजगार युवक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोजगार, युवकांचे हक्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनाची धार अधिक तीव्र केली असून, युवक आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आगामी काळातही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक2
- NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद. NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.1
- मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव लक्ष्मण बागुल गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे2
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीची बाइक रॅली; खासदार भास्कर भगरे रॅलीत सहभागी बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आज जोरदार बाइक रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी स्वतः बाइक रॅलीत सहभागी होत बेरोजगार युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. रॅलीत पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, मुन्ना अंसारी, महिला जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील वाढती बेरोजगारी, युवकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, रखडलेल्या शासकीय भरती प्रक्रिया आणि रोजगारनिर्मितीच्या प्रश्नांवर यावेळी राष्ट्रवादीकडून शासनाला लक्ष्य करण्यात आले. युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या भवितव्याला दिशा देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, रोजगाराच्या प्रश्नासोबतच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही रॅलीतून आवाज देण्यात आला. कांद्याला योग्य भाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सुरू झालेली बाइक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे’, ‘कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर बेरोजगार युवक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोजगार, युवकांचे हक्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनाची धार अधिक तीव्र केली असून, युवक आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आगामी काळातही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.4
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने महावृक्षारोपण अभियान; महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात ५ लाखांहून अधिक वृक्षलागवड मुरबाड :श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच किशनचंद टेकचंद परिवार, खेडब्रह्म यांच्या सौजन्याने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांत महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आयोजित या अभियानात सुमारे १ हजार ५० शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या अभियानात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराची प्रमुख भूमिका होती. ॲड. निता देशमुख व राजेश चावला यांच्या सहभागासह राजेश खन्ना, सुमना घोष, आशा पुजारी, वीणा रॉय, राकेश प्रजापती, प्रेरणा पाटील तसेच रायगड जिल्हा समन्वयक सुर्वे सर, खालापूर तालुका समन्वयक चव्हाण सर, कर्जत येथील पवार सर, म्हात्रे सर, पेण आदी मान्यवरांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. या वृक्षारोपण उपक्रमाची गुजरात सरकारकडून विशेष प्रशंसा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनेही अभियानाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अभियानाच्या आयोजकांकडून करण्यात आले.1