S.T. महामंडळाचा अजब कारभार! भररस्त्यात डिझेल संपले; तासाभरापासून प्रवासी ताटकळत. हिमायतनगर (प्रतिनिधी):ABS 24NEWS. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आज पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. हदगाव डेपोची एक बस डिझेलअभावी भररस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांना भरउन्हात मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव कडून हिमायतनगर कडे जाणारी एसटी बस आज दुपारी हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव कमानी जवळ अचानक थांबली. चालकाने तपासणी केली असता, बसमधील डिझेल संपल्याचे समोर आले. गेल्या एक तासापासून ही बस रस्त्याच्या कडेला उभी असून, पर्यायी व्यवस्था न झाल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले आहे. प्रवाशांचा संताप: "आम्ही वेळेवर पोहोचण्यासाठी एसटीचा प्रवास निवडतो, पण महामंडळाच्या अशा बेजबाबदारपणामुळे आमचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. बस सुटण्यापूर्वी डिझेलची पातळी तपासली जात नाही का?" असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार: एकीकडे एसटी महामंडळ प्रवासी वाढवण्यासाठी नवनवीन योजना आखत असताना, दुसरीकडे अशा प्राथमिक चुकांमुळे महामंडळाची नाचक्की होत आहे. जवळगाव परिसरात डिझेलअभावी बस अडकून पडल्याने हदगाव आगाराच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज का एसएससी परीक्षा में शानदार प्रदर्शन उदगीर : जमहूर हाईस्कूल एंड जूनियर कॉलेज, उदगीर ने इस वर्ष एसएससी (10वीं बोर्ड) परीक्षा में 99 प्रतिशत परिणाम हासिल कर अपनी उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम रखी है। विद्यालय के विद्यार्थियों ने शानदार अंक प्राप्त कर स्कूल और शहर का नाम रोशन किया। विद्यालय की छात्रा कु. मलकजी अजकिया वसीम ने 93.20 प्रतिशत अंक प्राप्त कर प्रथम स्थान हासिल किया। कु. सिद्दीकी उम्मे हानी अनीस ने 91.40 प्रतिशत अंकों के साथ द्वितीय स्थान प्राप्त किया, जबकि कु. सय्यदा शिफा बानो अहमद ने 88.20 प्रतिशत अंक लेकर तृतीय स्थान हासिल किया। इसके अलावा कु. सय्यदा महेक अल्ताफ (87.20%), कु. सय्यद बुशरा अफजल (86.60%), कु. शेख अल्फिया महेबूब (86.20%), कु. शेख अल्फिया फकीर अहमद (85.20%), कु. शेख इमान अब्दुल वहीद (83.20%), कु. गोलंदाज जीक्रा इम्रान (82.00%), कु. तांबोळी आयेशा अब्दुल खदीर (81.80%), कु. बागवान आयेशा खय्यूम (81.20%), कु. हाश्मी मसीरा शर्जील (80.80%) तथा मणियार अदनान नईम (80.60%) ने भी उल्लेखनीय सफलता प्राप्त की। विद्यालय में सफल विद्यार्थियों एवं उनके अभिभावकों के सम्मान में सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर विद्यालय के प्राचार्य दायमी रहीम सर, पर्यवेक्षक गोलंदाज वाजीद सर, हाश्मी हारीस सर, आई.जी. सर, मुजाहिद सर, बुशरा मैडम तथा कार्यालय प्रमुख फसीह सर उपस्थित रहे। सभी सफल विद्यार्थियों को पुष्पगुच्छ एवं सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर मुख्याध्यापक ने विद्यार्थियों और अभिभावकों को शुभकामनाएं देते हुए कहा कि मेहनत, अनुशासन और निरंतर प्रयास से विद्यार्थी जीवन में बड़ी सफलता प्राप्त कर सकते हैं। उन्होंने विद्यार्थियों को भविष्य की पढ़ाई के लिए प्रेरित भी किया। विद्यालय के शानदार परिणाम पर संस्था की सचिव डॉक्टर अंजुम कादरी सहित सभी पदाधिकारियों ने विद्यार्थियों, शिक्षकों और अभिभावकों को बधाई दी। विद्यालय प्रबंधन ने इस सफलता का श्रेय शिक्षकों के मार्गदर्शन, विद्यार्थियों की मेहनत और पालकों के सहयोग को दिया।1
- सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर1
- महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.1