एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले सोयाबीनचे 100 कट्टे जप्त करण्यात पोलिसांना यश सोयाबीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. स्वराज्य नगर, लातूर),सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर),आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर),विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर) सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले सोयाबीनचे 100 कट्टे जप्त करण्यात पोलिसांना यश सोयाबीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले अभिषेक सुहास यादव (वय 21,
रा. स्वराज्य नगर, लातूर),सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर),आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर),विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर) सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
- सोयाबीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. स्वराज्य नगर, लातूर),सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर),आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर),विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर) सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.2
- होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार मधुन गाडी1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर1
- लातूर एमआयडीसी पोलिसांची मोठी कार्यवाही लातूर एमआयडीसी पोलिसांनी सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला अटक करत 14 लाखाचा मुद्देमाल केला जप्त1
- स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा रु 3.75 लाखांचा साठा जप्त. एक आरोपी जेरबंद. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2016. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे, रा. चाकूर) यास ताब्यात घेतले.गोडाऊनची झडती घेतली असता झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये—NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 06 पोती, Extra Freshness नावाची 03 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.2
- ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लातूर पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई; ₹9.18 लाखाचे मॉडीफाय सायलेन्सर, हॉर्न, टेप जप्त करून सार्वजनिकरित्या नाश.* नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात या विशेष राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये वाहनांवर बसविण्यात आलेल्या बेकायदेशीर व कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत सदर उपकरणे जप्त करण्यात आलेले त्यामध्ये हॉर्न, फटाका सायलेन्सर, टेप, लेझर लाईट असे 09 लाख 18 हजार रुपयाचे उपकरणाच्या समावेश होता. वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबाह्य उपकरणे शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली विशेषतः युवकांकडून वापरले जाणारे “इंदुरी (फटाका) सायलेन्सर”, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांचा समावेश या कारवाईत करण्यात आला. या मोहिमेत एकूण — 149 बेकायदेशीर सायलेन्सर (अंदाजे किंमत ₹7,45,000/-),19 साऊंड बॉक्स (अंदाजे किंमत ₹1,52,000/-),06 हार्न (अंदाजे किंमत ₹3,000/-), 25 एलईडी लाईट्स (अंदाजे किंमत ₹5,000/-), 13 टेप रेकॉर्डर (अंदाजे किंमत ₹13,000/-), असा एकूण ₹9,18,000/- (नऊ लाख अठरा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले साहित्य भविष्यात पुन्हा वापरात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ते आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी सर्व जप्त साहित्य नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील सिमेंट रोडवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य पूर्णतः निकामी करण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्णपणे “इन-कॅमेरा” नोंदविण्यात आली. यानंतर निकामी करण्यात आले. सदर स्क्रॅप विक्रीतून ₹16,560/- इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे अधिकृत चलनाद्वारे जमा करण्यात येत आहे. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न, साऊंड सिस्टीम किंवा इतर ध्वनी प्रदूषण करणारी उपकरणे बसवू नयेत. अशा प्रकारचे कृत्य हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजाच्या आरोग्यास व शांततेस बाधा पोहोचवणारे आहे.भविष्यातही अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाविरोधात लातूर पोलीस दलाकडून सातत्याने व अधिक तीव्रतेने कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून सुरुवात करण्यात आली. वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती आहे. त्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आले व त्यांनी आपल्या पाल्याला एचपीव्ही लसीकरण करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेऊन आले1
- स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे,रा. चाकूर) यास ताब्यात घेतले. गोडाऊनची झडती घेतली असता झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये— NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 6 पोती, Extra Freshness नावाची 3 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.2