भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १५ जून २०२६ रोजी 'Special Police Establishment' (SPE) विरुद्ध कामता प्रसाद मिश्रा व इतर (Criminal Appeal No. 3743/2024) या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे माहिती अधिकार (RTI) कायदा अधिक मजबूत झाला असून, भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या नागरिकांना आता मोठी मदत मिळणार आहे. काही राज्य सरकारांनी भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या संस्थांना "गुप्तचर" किंवा "सुरक्षा" संस्था म्हणून घोषित करून माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, SPE सारख्या संस्थांचे मुख्य काम भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करणे आहे. या संस्था गुप्तचर किंवा राष्ट्रीय सुरक्षा विषयक काम करत नसल्यामुळे त्यांना RTI कायद्यापासून कोणतीही सूट देता येणार नाही. यानुसार, मध्य प्रदेश शासनाने २५ ऑगस्ट २०११ रोजी काढलेली अधिसूचना, ज्यामध्ये SPE ला RTI कायद्यापासून वगळण्यात आले होते, ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या संस्थांना माहिती अधिकार कायद्याचे पालन करावे लागेल आणि नागरिकांना माहिती द्यावी लागेल. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी देखील या निर्णयाचे मोठे महत्त्व असून, यामुळे भ्रष्टाचाराशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आरटीआय अधिक प्रभावी ठरेल. आता केवळ "ही संस्था आरटीआयच्या कक्षेबाहेर आहे" असे सांगून कोणतीही संस्था माहिती नाकारू शकणार नाही, ज्यामुळे सरकारी चौकशी संस्थांचे उत्तरदायित्व वाढेल आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता निर्माण होईल.

- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- महाराष्ट्रातील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हे थक्क करणारे दृश्य समोर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या संख्येने सिलेंडर पाण्यात वाहून जाण्यामागचे नेमके काय कारण असू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- पालघर तालुक्यातील कुडण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे आणि कल्पेश अशोक म्हात्रे यांच्या शेतातील सुमारे ८०० ते ९०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंबा, फणस, शेवगा आणि नारळ या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत तारापूर विभागाचे (पालघर) सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर यांनीही नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. मात्र, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक सदस्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तीव्र नाराजी आणि तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.1
- ठाण्यातील हाय स्ट्रीट मॉलमध्ये नदीम मेमन यांच्या वतीने 'हाय स्ट्रीट क्रिएटर स्टुडिओ' या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही नदीम मेमन यांची एक नवी पेशकश आहे.1
- भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी वीटभट्टी मजूर सविता रावते यांना आरोग्य यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणामुळे आपले बाळ गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र विधान परिषदेत गाजली. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी हा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आरोप केला की, २२ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर आरोग्य विभागाने पूर्णपणे संवेदनाहीन भूमिका घेतली होती. केवळ लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच, गर्भधारणेदरम्यान आवश्यक सोनोग्राफी न करणे, आधार कार्डाचे कारण देऊन संदर्भ चिठ्ठी नाकारणे, माता-बालक सुरक्षा कार्डावरील नोंदींबाबत त्रुटी आणि फेटल डॉप्लर उपलब्ध असूनही त्याचा वापर न करणे, अशा गंभीर बाबींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत बालकाच्या कुटुंबीयांवर विविध मार्गांनी दबाव आणून त्यांच्याकडून सकारात्मक जबाब घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आशा सेविकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. या संपूर्ण प्रकरणात पीडित कुटुंबाला भेट देऊन पाठपुरावा करणाऱ्या 'भूमिपुत्र एल्गार संघटने'चे अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेखही चित्रा किशोर वाघ यांनी केला. प्रमोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना केवळ कारवाई हाच उद्देश नसून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या प्रकरणामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता चौकशीनंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- कल्याण तालुक्यातील खडवली येथून शनिवार संध्याकाळी पडघाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बस खडवली बसस्थानकापासून अवघ्या एक-दोन मिनिटांच्या अंतरावर पोहोचली असताना, बसमधून धूर आणि आग निघत असल्याचे बाहेरील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबात बस चालक आणि प्रवाशांना सावध केले. माहिती मिळताच चालकाने प्रसंगावधान राखत बस लगेच थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते, मात्र सर्वांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.1