महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास वेगात; मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल गोपनीय – पोलिसांचा इशारा जनसंघर्ष न्युज नेटवर्क परळी (बीड), ता.८ :परळी शहरातील वनविभाग कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत घडलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असून, या प्रकरणात काही संशयितांवर पॉलीग्राफ, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिससारख्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते तपास यंत्रणेच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी अशोक दत्तात्रय मुंडे (रा. भोपळा, ता. परळी वै., जि. बीड) यांनी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचे मोठे भाऊ महादेव दत्तात्रय मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ ते २२ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९१/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांवर पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर), BEOS / ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र या चाचण्यांचे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, माध्यमे किंवा नागरिकांना देण्यात आलेले नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाबाबत अफवा पसरवू नयेत, खोटी माहिती प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक, बीड यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- Post by Vijay Meher1
- Post by कर्जत लाईव्ह1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat1
- Post by Vijay Meher1