कामगारांच्या प्रश्नांसाठी आमदार हिरामण खोसकर यांचा कामगार मंत्र्यांकडे पाठपुरावा रोथे कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्या तसेच त्यांच्या प्रश्नांची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. कामगारांच्या प्रश्नांबाबत आमदार खोसकर यांच्याकडून यापूर्वीपासूनच सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस निर्णय होण्यासाठी संबंधित प्रशासन व विभागांकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. रोथे कंपनीतील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवून प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमदार हिरामण खोसकर यांचा संघर्ष आणि पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कामगारांच्या प्रश्नांसाठी आमदार हिरामण खोसकर यांचा कामगार मंत्र्यांकडे पाठपुरावा रोथे कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्या तसेच त्यांच्या प्रश्नांची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. कामगारांच्या प्रश्नांबाबत आमदार खोसकर यांच्याकडून यापूर्वीपासूनच सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस निर्णय होण्यासाठी संबंधित प्रशासन व विभागांकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. रोथे कंपनीतील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवून प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमदार हिरामण खोसकर यांचा संघर्ष आणि पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
- धोकादायक ठिकाणी झेंडे अथवा सजावट करताना जीव धोक्यात घालू नका; उच्चदाबाच्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहन करण्यात येत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सातपूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेपी नगर येथे दुर्दैवी दुर्घटनेने या आनंदावर विरजण पडले. हनुमान मंदिरावर गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त भगवा झेंडा लावत असताना दोन मुलांना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शंकर मिरेकर (१५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी चढले होते. मात्र, झेंड्याला असलेल्या लोखंडी रॉडचा जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने क्षणार्धात मोठा विद्युत अपघात झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आयुष खाली कोसळला, तर आदित्यलाही गंभीर स्वरूपाचा विजेचा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आयुषला तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदित्यला कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे एपीआय भडांगे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे. विशेषतः उच्चदाबाच्या विद्युत तारांजवळ झेंडे, पताका किंवा लोखंडी साहित्य हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.3
- सुरगाणा तालुक्यातील दुमी वरंबा रस्त्याची दुरवस्था झाली आहे1
- येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी नेमकी काय कारवाई झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असताना, शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी प्रतिनिधी | बोरगाव बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण? खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत घाटकोपर पूर्वचे आमदार का बनले भिकारी याचा सविस्तर वृतांत1