logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. ​दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ​या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. ​श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

10 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
10 hrs ago

येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. ​दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ​या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. ​श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. ​दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ​या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. ​श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन
भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले.
​दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
​या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले.
​श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चांदवडला आगमन मिरवणूकांनी गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना; ‘वरचे गावचा राजा’ची लक्षवेधी मिरवणूकीने स्थापना; ‘महाकाल अघोरी तांडव’चा सजीव देखावा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणूका काढून आपल्या गणरायाची उत्साहात, वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बाळगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फूर्टी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवड शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावच्या राजा’च्या आगमन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रुप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यासह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेल्या हरियाणा येथील महाकाल अघोरी पथकाचा शिवतांडव, अग्नीतांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रुप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेली अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरीकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणूकीत तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आठवडे बाजार तळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्ली मार्गे सुमारे पाच तासानंतर मिरवणूकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ---- गणेश मंडळांकडून भव्य गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना- संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजे च्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूतींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणूकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.
    4
    चांदवडला आगमन मिरवणूकांनी गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना; ‘वरचे गावचा राजा’ची लक्षवेधी मिरवणूकीने स्थापना; ‘महाकाल अघोरी तांडव’चा सजीव देखावा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी
चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणूका काढून आपल्या गणरायाची उत्साहात, वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बाळगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती.
शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फूर्टी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवड शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावच्या राजा’च्या आगमन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रुप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यासह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेल्या हरियाणा येथील महाकाल अघोरी पथकाचा शिवतांडव, अग्नीतांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रुप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेली अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरीकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणूकीत तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आठवडे बाजार तळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्ली मार्गे सुमारे पाच तासानंतर मिरवणूकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
----
गणेश मंडळांकडून भव्य गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना-
संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजे च्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूतींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणूकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.
    user_Mahendra kantubhai Gujrathi
    Mahendra kantubhai Gujrathi
    Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार
    2
    वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना 
सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती  बाप्पाची मुती॔ बसुन  मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची  पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार
    user_समाधान शिंदे
    समाधान शिंदे
    Media Consultant चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    1
    शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
    1
    NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    1
    ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.
    1
    आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत 
त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे.
आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या.
यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे.
महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय
आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दालन नाही मिळाले,वंचितची गांधीगिरी,पार्किंगमध्येच बैठक! वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापती करुणा जाधव यांना दालन मिळाले नसल्याने त्यांनी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत गांधीगिरी आंदोलन केले. सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत अखेर करुणा जाधव यांना दालन देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलक प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव यांच्याशी संवाद साधला .
    1
    दालन नाही मिळाले,वंचितची गांधीगिरी,पार्किंगमध्येच बैठक!
वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापती करुणा जाधव यांना दालन मिळाले नसल्याने त्यांनी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत गांधीगिरी आंदोलन केले. सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत अखेर करुणा जाधव यांना दालन देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलक प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव यांच्याशी संवाद साधला .
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.