विविध ठिकाणच्या न्यायालयात प्रलंबित दावे ही चिंतेची बाब, त्याबाबत सर्व घटकांनी कारण मीमांसा करावी फलटण : आज सर्व ठिकाणच्या न्यायालयात ३०/४० वर्षांचे दावे प्रलंबीत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करीत न्यायिक प्रक्रियेतील सर्व घटकांनी याची कारण मीमांसा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे न्यायाधीशांना नियम आहेत, त्याप्रमाणे वकिलांनाही नियम हवेत, सध्या अनेक दावे न्यायालयांऐवजी पोलीस ठाण्यात चालतात, हे अत्यंत चुकीचे असून यावर चिंतन करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व सातारा जिल्ह्याचे पालक न्यायाधीश न्या. नितीन बोरकर यांनी केले. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन न्या. नितीन बोरकर यांच्या हस्ते फलक अनावरण व फीत कापून करण्यात आले, त्यानंतर सजाई गार्डन कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात न्या. बोरकर बोलत होते. यावेळी न्या. अनिल पानसरे, न्या. राजेश पाटील, न्या. संजय देशमुख, न्या. रणजितसिंह भोसले, जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वाघमारे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सदस्य ॲड. विठ्ठलराव कोंडे देशमुख आणि ॲड. वसंतराव भोसले यांच्यासह सातारा, फलटण, वाई, माण, खंडाळा, कोरेगाव, खटाव, जावली तालुक्यातील न्यायाधीश आणि वकील संघटनांचे पदाधिकारी, सदस्य तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, नगरसेवक संदीप चोरमले यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील वकील पक्षकार नागरीक उपस्थित होते. फलटणमध्ये न्यायालयांची साखळी पूर्ण झाली असून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या निर्मितीमुळे फलटणकरांना सातारा पर्यंत ७० कि. मी. करावी लागणारी धावपळ थांबली आहे, त्यामुळे पक्षकार आणि वकीलांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे न्या. नितीन बोरकर यांनी निदर्शनास आणून दिले. आपले बालपण फलटण मध्ये गेले असल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिक ते वकील आणि आता न्यायदानाच्या क्षेत्रात कसा आलो या सगळ्या आठवणींना उजाळा देत सरकारी वकील व न्यायाधीश यांनी पक्षकार व साक्षीदारांना न्यायालयात कम्फर्टेबल ठेवण्याचे काम केले पाहिजे अशी अपेक्षा न्या. अनिल पानसरे यांनी व्यक्त केली. आपण फलटण न्यायालयात काम केले असल्याचे निदर्शनास आणून देत त्यामुळे आज माहेरी आल्याचा आनंद होत आहे. या वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ५० वर्षे जपून ठेवा, हा फलटणचा ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे सांगताना न्याय द्यायला उशीर होणे हा व्यवस्थेवरील काळा डाग आहे. इथला पक्षकार हा शेतकरी (अन्नदाता) आहे, त्याला न्याय देण्याचे पवित्र काम झालेच पाहिजे अशी अपेक्षा न्या. देशमुख यांनी व्यक्त केली. फलटण येथे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर होताच आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या २ दिवसांत तब्बल २०४५ केसेस फलटण न्यायालयात ट्रान्सफर केल्या आहेत, ई-सुविधा आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सज्ज असलेल्या या न्यायालयात उद्याचा ६७ केसेसचा बोर्ड तयार असून, उद्या पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा न्या. अरविंद वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिले. फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितिन जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात फलटणचे हे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु झाल्यामुळे फलटण येथील वकील, पक्षकार, साक्षीदार वगैरे सर्वच घटकांचा वेळ आणि पैसा तर वाचणार आहेच मात्र त्याच बरोबर वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी सातारा येथे जाता येताना होणारे अपघात त्यातून होणारा मनस्ताप कायमचा टळला असल्याचे आवर्जून सांगितले. या कामी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन शासन स्तरावर घेतलेल्या ठोस भूमिकेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. फलटण वरिष्ठ स्तर न्यायालयाचे प्रथम न्या. एस. पी. सय्यद यांनी आभार मानले.

- विक्रम शिंदे /भोर दि.16 कापुरहोळ भोर वाई हा बहुचर्चित रस्ता अंतिम टप्प्यात आहे.मात्र आधी केलेल्या रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असून माळवाडी ते नेकलेस पॉईंट दरम्यान मोरी वरील रस्ता खचल्याने पोकलेनच्या सहायाने रस्ता उखडून आज (दि.16) दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.मात्र या बाबत रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.रस्त्याच्या गुणवतेबाबत शंका व्यक्त केली आहे.1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- महोबा (बुंदेलखंड)। भ्रष्टाचार का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है। बुंदेलखंड के महोबा जिले में जल जीवन मिशन के तहत लगभग 65 लाख रुपये की लागत से बनाई गई पानी की टंकी टेस्टिंग के महज एक दिन बाद ही लीक हो गई। जानकारी के मुताबिक 13 फरवरी को टंकी की विधिवत टेस्टिंग की गई थी। अधिकारियों और संबंधित कर्मचारियों की मौजूदगी में पानी भरकर इसकी जांच की गई। लेकिन टेस्टिंग के अगले ही दिन टंकी से पानी रिसने लगा, जिससे निर्माण कार्य की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि सरकार ने गांव-गांव स्वच्छ पेयजल पहुंचाने के लिए करोड़ों रुपये खर्च किए हैं, लेकिन यदि निर्माण कार्य में ही लापरवाही बरती जाएगी तो योजनाओं का उद्देश्य कैसे पूरा होगा? लोगों ने आरोप लगाया कि निर्माण में घटिया सामग्री का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण टंकी इतनी जल्दी क्षतिग्रस्त हो गई। इस घटना के बाद विभागीय अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। आखिर 65 लाख रुपये की लागत से बनी टंकी एक दिन भी सही सलामत नहीं रह सकी, तो निर्माण की निगरानी किस स्तर पर हुई? ग्रामीणों ने मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते जिम्मेदारों पर कार्रवाई नहीं की गई, तो जल जीवन मिशन जैसी महत्वाकांक्षी योजना की विश्वसनीयता पर असर पड़ सकता है।1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- बरेली। थाना नवाबगंज क्षेत्र में नाबालिग युवती के अपहरण एवं दुष्कर्म के गंभीर मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए अभियोग पंजीकृत कर आरोपी को हिरासत में ले लिया है। प्रकरण की विवेचना तेजी से की जा रही है और पीड़िता को आवश्यक चिकित्सीय एवं कानूनी सहायता उपलब्ध कराई गई है। इस संबंध में क्षेत्राधिकारी नवाबगंज, बरेली श्री नीलेश मिश्र ने बताया कि घटना की सूचना मिलते ही थाना नवाबगंज पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुकदमा दर्ज किया और विशेष टीम गठित कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस की सक्रियता के चलते आरोपी को शीघ्र ही पकड़ लिया गया। सीओ श्री मिश्र ने बताया कि आरोपी से पूछताछ की जा रही है तथा साक्ष्यों के आधार पर विधिक कार्रवाई आगे बढ़ाई जा रही है। उन्होंने स्पष्ट किया कि नाबालिग से जुड़े मामलों में पुलिस पूरी संवेदनशीलता और गंभीरता के साथ कार्रवाई करती है और दोषी को कानून के तहत कड़ी सजा दिलाने का प्रयास किया जाएगा। पुलिस प्रशासन ने आमजन से अपील की है कि किसी भी संदिग्ध गतिविधि की सूचना तत्काल पुलिस को दें, ताकि समय रहते आवश्यक कार्रवाई की जा सके। मामले में आगे की कानूनी प्रक्रिया जारी है।1