Shuru
Apke Nagar Ki App…
आम्हाला पूर्ण माहिती आहे की प्रत्येक उमेदवारांकडून किती पैसे घेतले; आमचेही मित्र आहेत राष्ट्रवादीमध्ये : बाळा भेगडे
NEWS 24 MAHARASHTRA
आम्हाला पूर्ण माहिती आहे की प्रत्येक उमेदवारांकडून किती पैसे घेतले; आमचेही मित्र आहेत राष्ट्रवादीमध्ये : बाळा भेगडे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Deepak Sagar1
- गॅस सिलेंडर टंचाई; एचपी बुकिंग नंबर स्विच ऑफ अमेरिका-इरान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, पुणे परिसरात गॅस सिलेंडर टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच एचपी गॅस बुकिंगचा फोन नंबर अनेकदा स्विच ऑफ लागत असल्याने ग्राहकांना बुकिंग करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांनी तातडीने बुकिंग सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.1
- जुन्नर पुणे : - : पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळजनक घटना घडलीये. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला केला अन मग तरुणाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केलीये. एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे नाव महेश डामसे होते. महेशचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वस्तीगृहातून ही तरुणी महाविद्यालयात निघाली होती. तेंव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर वार केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला. तेंव्हा आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली तर तिथंच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं, त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येतंय. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेलाय.... : महादेव शेलार - एपीआय, गुन्हे शाखा पुणे ग्रामीण #जुन्नर #पुणेग्रामीणपोलीस #एकतर्फीप्रेम #प्रेमातूनहल्ला #धक्कादायकघटना #क्राईमन्यूज #पुणेबातमी #तरुणीवरहल्ला #आत्महत्या #महाराष्ट्रन्यूज #Junnar #PuneCrime #OneSidedLove #CrimeNews #PuneRuralPolice #MaharashtraNews #BreakingNews #AttemptToMurder #SuicideCase #IndiaNews1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्याचा बांध फोडला; तहसीलदारांकडे तक्रार विक्रम शिंदे /भोर दि.13 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांटबी येथील शेतकरी लक्ष्मण भैरू खोपडे यांच्या गट नं. ३८५ मधील बांध पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीरपणे फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खोपडे यांनी १३ मार्च रोजी भोर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गट नं. ३८० मधील पाणंद रस्ता खुला करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी मंडलाधिकारी आंबवडे आणि नायब तहसीलदार मॅडम पोलीस फौजफाटा आणि जेसीबी घेऊन आले. खोपडे यांनी सांगितले की, सदर पाणंद रस्ता आधीच २६ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला असून शासकीय मोजणीनुसार १२ फुटाचा रस्ता मान्य झाला होता. तरीही ओढ्यापासून १०० ते ११० फूट लांब बांध पोलीस बळाने फोडण्यात आला. या कारवाईत शेतजमीन, जनावरांचा चारा, जळाऊ लाकूड आणि गवऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील जमीन विकत घेतलेल्या बाहेरील व्यक्तींच्या सांगण्यावरून ही बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. नुकसानभरपाई, बांध पूर्ववत करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून हा अर्ज जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी भोर, आमदार शंकर मांडेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवण्यात आला आहे.3
- Post by Shrikant Pote1
- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील चोरट्यांना नेरूळ पोलीसांचे मार्फतीने अटक करून त्यांच्याकडून एकुण ११ मोटार सायकल, व ५ रिक्षा रिकव्हर1
- Post by Deepak Sagar1
- मावळ पुणे : - मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी अमृतांजन ब्रिज परिसरात मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि मृत्युंजय देवदूत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करण्यात आला.दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आली.या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सध्या एक्सप्रेस वेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे... #MumbaiPuneExpressway #ExpresswayAccident #TruckAccident #Lonavala #AmrutanjanBridge #MavalNews #PuneNews #HighwayTraffic #RoadAccident #BreakingNews #IRBPatrolling #HighwayPolice #Khopoli #TrafficUpdate1