Shuru
Apke Nagar Ki App…
पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge1
- कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.3
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏1
- शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे3
- सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.1
- पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक1