logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कॉक्रोच जनता पार्टीची अहिल्यानगर जिल्हा बैठक उत्साहात संपन्न कॉक्रोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक २६ जून रोजी सायंकाळी ८.०० ते ९.३० या वेळेत गुलमोहर रोड, सावेडी जिल्हा अहिल्यानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीने यापूर्वी राबविलेल्या विविध आंदोलनांना मिळालेले यश, त्या आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रश्न मांडण्याची पद्धत, जनतेचा सहभाग वाढविण्याचे नियोजन तसेच भविष्यातील जनआंदोलने अधिक प्रभावी व संघटित पद्धतीने राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार बैठकीतील प्रमुख विषयांपैकी ‘स्कूल ठीक करो’ अभियान हा महत्त्वाचा विषय होता. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सरकारी शाळांचे सर्वेक्षण व ऑडिट करण्याचे नियोजन करण्यात आले. शाळेची इमारत, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, पंखे, प्रकाश व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा, परिसराची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, खेळाचे मैदान तसेच इतर मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची नोंद घेण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळानिहाय माहिती संकलित करून त्यामधील त्रुटी व आवश्यक सुविधांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी व प्रशासनाकडे सादर करून शाळांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रश्न मांडणार केवळ समस्या मांडण्याऐवजी प्रत्येक शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून पुराव्यांसह व वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे प्रशासनासमोर प्रश्न मांडण्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सरकारी शाळांपर्यंत पोहोचून तेथील परिस्थिती समजून घेणे, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती घेणे, यावरही चर्चा झाली. संकलित माहितीच्या आधारे शाळांच्या समस्यांना प्राधान्यक्रम देऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. संघटनात्मक बांधणीवर विशेष भर बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेसोबतच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून ते योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यासाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणे, हा पक्षाच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्याच्या रणनीतीवर चर्चा यापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीने राबविलेल्या आंदोलनांमधून मिळालेल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. एखादा जनतेचा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडताना प्रश्नाची वस्तुस्थिती समजून घेणे, पुरावे संकलित करणे, संबंधित नागरिकांशी संवाद साधणे, प्रशासनाकडे योग्य पद्धतीने निवेदन देणे आणि त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच आंदोलन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात व्यापक जनसंपर्क वाढविण्याचा संकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी संबंधित प्रश्न, सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा आणि प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी ‘स्कूल ठीक करो’ अभियान हे केवळ एक आंदोलन न राहता सरकारी शाळांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीचे लोकसहभागातून चालणारे अभियान बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कॉक्रोच जनता पार्टी चे पदाधिकारी अक्षय शिंदे (organization joint secretarya), डॉ. नितीन दिघे (West zone cordinator), ॲड. जयसिंग शेरे (West zone cordinator), क्षितिज पगार, प्रज्वल कसबे, सागर स्वामी, प्रथमेश दरेकर , सुशील शेळके, महेश सटाले , सागर शेळके , प्रवीण फराटे , प्रथमेश दरवडे आणि अहिल्यानगर चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच ‘स्कूल ठीक करो’ अभियान अधिक व्यापक करण्याचा आणि सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे ठोसपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.

1 hr ago
user_संस्कार न्यूज
संस्कार न्यूज
Advertising agency Karjat, Ahmednagar•
1 hr ago
24cc6c7c-461f-405a-86de-fd4a83e87e99

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट
    1
    कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
    4
    लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.
    1
    इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा
इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई
सुपा, बारामती | 
इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे.
AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.
    user_Apcrimenewslive
    Apcrimenewslive
    Baramati, Pune•
    3 hrs ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    1
    * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा..
शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे  मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे.
शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.
गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे,  शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार,  ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे,  स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे,  राजेंद्र गावडे,  प्रितम पाटील,  बाळासाहेब म्हस्के,  मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे,  नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
“गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”
“एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख
फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.”
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
> *विशेष चौकट*
>
> *खिदमत फाउंडेशन, शिरूर*
>
> *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    38 min ago
  • ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली

शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
    2
    बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण!

बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण!
बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. 
गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
    1
    लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.