हिंगोलीत प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात 26 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयावर ओबीसीं च्यावतीने दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ओबीसी महाएल्गार मोर्चा च्या पूर्वतयारी निमित्त दि.26 ऑगस्ट 2026 रोज बुधवारला दु.12 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे प्रा.लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ओबीसींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात बोगस कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे होणारी घुसखोरी थांबविणे, ओबीसी विद्यार्थ्यांचे 27 टक्के शैक्षणिक आरक्षण कायम ठेवणे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देणे तसेच प्रत्येक तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त वसतिगृह सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच ओबीसी बेरोजगार युवकांसाठी 27 टक्के आरक्षणाच्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय नोकरभरती तातडीने सुरू करावी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, मार्केट कमिटी यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची सर्व क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करावी आणि ओबीसी-एससी-एसटी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या जाहीर करावी, या मागण्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी एल्गार मोर्चा समितीचे हिंगोली जिल्हा समन्वयक ॲड रवी शिंदे,गोपाल सातपुते, विठ्ठल गाभणे ,प्रा. गजानन कुटे ,प्रा. गजानन थोरात प्रवीण राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.

- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.1
- 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes1
- जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी1
- नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.1