logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कन्नड तालुक्यातील बीएलओंना मानधनापासून वंचित ठेवण्याचा आरोप; तातडीने मानधन द्यावे अन्यथा कामबंदचा इशारा कन्नड तालुक्यातील बीएलओंना मानधनापासून वंचित ठेवण्याचा आरोप; तातडीने मानधन द्यावे अन्यथा कामबंदचा इशारा कन्नड प्रतिनिधी कन्नड तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ब्लॉक लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी तसेच त्याआधी पोलचिट वाटप, मतदार यादी संदर्भातील कामे, विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडूनही बीएलओंना अद्याप मानधन देण्यात आले नसल्याने संबंधितांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कन्नड तालुक्यातील सर्व बीएलओंनी निवडणूक काळात प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडली. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच मतदानापूर्वी घरपोच पोलचिट वाटप, मतदारांशी संपर्क, विविध अहवाल सादर करणे आदी कामे त्यांनी केली. मात्र एवढी जबाबदारी पार पाडूनही त्यांना मानधन मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अनेक बीएलओंनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकृत ग्रुपवर मानधनाबाबत विचारणा केली होती. मात्र या मागणीला अधिकाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीएलओंमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीएलओंच्या वतीने शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सतीश कोळी यांनी प्रशासनाकडे तातडीने मानधन देण्याची मागणी केली आहे. “निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बीएलओंनी जबाबदारीने काम केले. त्यांचे मानधन थकवणे अन्यायकारक असून त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मानधनाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास सर्व बीएलओ पुढील प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार टाकतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भात उद्या माननीय उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणाऱ्या बीएलओंना मानधनापासून वंचित ठेवले जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. --- सतीश कोळी कन्नड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काम करूनही बीएलओंना मानधन न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. शिक्षक समितीचे सतीश कोळी यांनी तात्काळ मानधन देण्याची मागणी करत कामबंदचा इशारा दिला असून उद्या एसडीएम यांना निवेदन देणार आहेत.

1 day ago
user_अरबाज शेख
अरबाज शेख
Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे
    1
    देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे
    user_Amol  bhalerao
    Amol bhalerao
    Photographer खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    1
    अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन,
सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 min ago
  • माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.
    1
    माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.
    user_दैनिक,"निळे प्रतीक"
    दैनिक,"निळे प्रतीक"
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    2
    सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Farmer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by SamirQureash Quresh
    1
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    34 min ago
  • धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.
    1
    धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड 
गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक
धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका
मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या
हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. ​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. ​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    1
    ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे.
​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड  व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे.
​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    1
    सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री  आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.