वाडी येथे घरफोडी सोन्या-चांदीचा ऐवज लंपास खामगाव : बंद असलेले घर फोडून सोन्या-चांदीच्या दागीन्यासह रोख लंपास केल्याची घटना ७ जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाडी सप्तशृंगीनगर स्थित अनिल जिजाबराव एकडे सेवानिवृत्त कर्मचारी हे आपल्या मुलाकडे घर बंद करुन बँगलोर येथे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील सोन्याची अंगठी ४ ग्रॅम, चांदीचे दोन सिक्के, सोन्याची अंगठी जुनी असा एकूण ६ हजार ९०० रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. ही बाब अनिल एकडे ६ जानेवारी रोजी घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी शहर पोस्टेला धाव घेवून उपरोक्त घटनेची तक्रार दिली. या तक्रारीवरुन खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक सागर भगत करीत आहे.

- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- Post by Peoples News 241
- हिदायत पटेल की हत्या से पहले का आखरी वीडीओ ओर स्पीच जिसे लोग सुनके उनकी तारीफ कर रहे हे2
- मा जिजाऊ1
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar1
- Post by Sharad Dayedar1
- प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई खामगाव : प्रतिबंधित व घातक नायलॉन ने मांजाची विक्री करणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोची गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० रिल नायलॉन मांजा असा सुमारे ६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोची गल्ली भागात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात छापा टाकला.चेतनमुकेश चव्हाण (२७, रा. मोची गल्ली, खामगाव) हा नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० रिल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत श्रींगारे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोटे, तसेच रवींद्र कजर, गणेश कोल्हे, सागर भगत, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव व अमर ठाकूर यांनी केली.1