logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कहाळा बुद्रुकमध्ये 'जलजीवन'चा फज्जा; दीड कोटी खर्चुनही ग्रामस्थांच्या नळाला पाणीच नाही नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत

2 hrs ago
user_Shuddhodhan Dhawale
Shuddhodhan Dhawale
Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago

कहाळा बुद्रुकमध्ये 'जलजीवन'चा फज्जा; दीड कोटी खर्चुनही ग्रामस्थांच्या नळाला पाणीच नाही नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे या योजनेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज असतानाही प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नळाला अजून थेंबभरही पाणी आलेले नाही त्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बोरगडी मारोती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा! 🙏🚩 “जय हनुमान... जय श्रीराम... बजरंगबली की जय...” च्या जयघोषात बोरगडी येथील मारोती मंदिरात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. सुमारे ३० हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेत नवस फेडला. तळपत्या उन्हातही अनेक भाविक पायी चालत येत श्रद्धेचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. पूजा-अभिषेक, फुलांच्या माळा व नैवेद्य अर्पण करून भक्तांनी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. 📅 उद्या (३ एप्रिल) कीर्तन, महाप्रसाद व भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 🙏 जय बजरंगबली! 🚩 #HanumanJayanti #Bajrangbali #JaiHanuman #JaiShriRam #Boragdi Himayatnagar MarotiMandir Devotion Faith Maharashtra FestivalVibes IndianCulture TrendingNews NNLDigitalMedia 🚩
    1
    बोरगडी मारोती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा! 🙏🚩
“जय हनुमान... जय श्रीराम... बजरंगबली की जय...” 
च्या जयघोषात बोरगडी येथील मारोती मंदिरात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. सुमारे ३० हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेत नवस फेडला.
तळपत्या उन्हातही अनेक भाविक पायी चालत येत श्रद्धेचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. पूजा-अभिषेक, फुलांच्या माळा व नैवेद्य अर्पण करून भक्तांनी सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
📅 उद्या (३ एप्रिल) कीर्तन, महाप्रसाद व भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
🙏 जय बजरंगबली! 🚩
#HanumanJayanti #Bajrangbali #JaiHanuman #JaiShriRam #Boragdi Himayatnagar MarotiMandir Devotion Faith Maharashtra FestivalVibes IndianCulture TrendingNews NNLDigitalMedia 🚩
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्‍वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे बिनविरोध
    1
    महिला व बालकल्याण समिती सभापतीपती ऐश्‍वर्या अजय चव्हाण तर समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंढे  बिनविरोध
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 hrs ago
  • देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    1
    देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ 
लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन 
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. 
या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. 
यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. 
गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. 
सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    1
    लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली.
गुरुवार दि. 02 एप्रिल 2026.
लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे.
पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले.
या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. #maxparbhani #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook
    1
    पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
#maxparbhani  #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • दारव्हा पंचायत समिती परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी जी.प. यवतमाळ अंतर्गत तब्बल १३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र ही व्यवस्था सध्या धूळ खात पडलेली असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ चा फलक परिसरात लावण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू नसल्याने ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना फेब्रुवारी आणि मार्च महिने उलटून गेले तरी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून, “उन्हाळ्यात नाही तर मग पावसाळ्यात थंड पाणी देणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. योजनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या छायाचित्रांसह फलक लावलेले असताना प्रत्यक्षात सुविधा बंद असल्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने (लोकसभा अध्यक्ष, यवतमाळ-वाशीम) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी घनश्याम चव्हाण, गजानन चव्हाण, राजू पेटकर, निलेश राठोड, गणेश राठोड, जे. एन. कांबळे, सौरव चव्हाण, प्रशांत ठाणे, दशरथ शेंदूरकर, योगेश भभूतकर, सदानंद खिल्लारे, ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर धवणे, पी. एस. बरडे, रविंद्र गजभिये, संतोष इंगोले, नामदेव घोडाम, अशोक मुजमुले, पी. व्ही. निचळे, राहुल मुधाने, अजाबराव ढवळे, अमोल रुणवाल, एकनाथ तायडे, अरुण सोनोने, अंकुश उजवणे, ओम कटके आदींच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले.
    1
    दारव्हा पंचायत समिती परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी जी.प. यवतमाळ अंतर्गत तब्बल १३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र ही व्यवस्था सध्या धूळ खात पडलेली असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ चा फलक परिसरात लावण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू नसल्याने ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना फेब्रुवारी आणि मार्च महिने उलटून गेले तरी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून, “उन्हाळ्यात नाही तर मग पावसाळ्यात थंड पाणी देणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
योजनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या छायाचित्रांसह फलक लावलेले असताना प्रत्यक्षात सुविधा बंद असल्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने (लोकसभा अध्यक्ष, यवतमाळ-वाशीम) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी घनश्याम चव्हाण, गजानन चव्हाण, राजू पेटकर, निलेश राठोड, गणेश राठोड, जे. एन. कांबळे, सौरव चव्हाण, प्रशांत ठाणे, दशरथ शेंदूरकर, योगेश भभूतकर, सदानंद खिल्लारे, ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर धवणे, पी. एस. बरडे, रविंद्र गजभिये, संतोष इंगोले, नामदेव घोडाम, अशोक मुजमुले, पी. व्ही. निचळे, राहुल मुधाने, अजाबराव ढवळे, अमोल रुणवाल, एकनाथ तायडे, अरुण सोनोने, अंकुश उजवणे, ओम कटके आदींच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.