logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लाखोंचा खर्च, पण पाणी नाही! दारव्हा पंचायत समितीतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठप्प दारव्हा पंचायत समिती परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी जी.प. यवतमाळ अंतर्गत तब्बल १३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र ही व्यवस्था सध्या धूळ खात पडलेली असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ चा फलक परिसरात लावण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू नसल्याने ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना फेब्रुवारी आणि मार्च महिने उलटून गेले तरी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून, “उन्हाळ्यात नाही तर मग पावसाळ्यात थंड पाणी देणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. योजनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या छायाचित्रांसह फलक लावलेले असताना प्रत्यक्षात सुविधा बंद असल्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने (लोकसभा अध्यक्ष, यवतमाळ-वाशीम) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी घनश्याम चव्हाण, गजानन चव्हाण, राजू पेटकर, निलेश राठोड, गणेश राठोड, जे. एन. कांबळे, सौरव चव्हाण, प्रशांत ठाणे, दशरथ शेंदूरकर, योगेश भभूतकर, सदानंद खिल्लारे, ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर धवणे, पी. एस. बरडे, रविंद्र गजभिये, संतोष इंगोले, नामदेव घोडाम, अशोक मुजमुले, पी. व्ही. निचळे, राहुल मुधाने, अजाबराव ढवळे, अमोल रुणवाल, एकनाथ तायडे, अरुण सोनोने, अंकुश उजवणे, ओम कटके आदींच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले.

2 hrs ago
user_GAJAANNAN THHAKKARE
GAJAANNAN THHAKKARE
दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • विषारी साप चावल्याने ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू धामणगांव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५ वर्षे) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याने जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    विषारी साप चावल्याने ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू
धामणगांव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५ वर्षे) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला.  प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याने जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    13 hrs ago
  • #अपघात#news#nandednews#maharashtranews#
    1
    #अपघात#news#nandednews#maharashtranews#
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • # राजकीय न्यूज #news#kinwatnews#nandednews#nanded#ncpnanded#ncp#maharashtranews#
    1
    # राजकीय न्यूज #news#kinwatnews#nandednews#nanded#ncpnanded#ncp#maharashtranews#
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी! यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम सर्व जात-धर्मीयांचा सहभाग डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय 🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये: 🔥 मशाल रॅली 🥁 हलगी व ढोल पथक 💃 मुलींचे लेझीम पथक 🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे 🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे 🎺 पारंपारिक बँड वादन 🕖 वेळ: सकाळी ७ ते १२ 📍 ठिकाण: नांदेड 👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश #AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration
    1
    नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या पद्धतीने साजरी!
यंदा नांदेडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जातविरहीत, डिजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. 
इंजि. प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम
सर्व जात-धर्मीयांचा सहभाग
डिजेमुक्त जयंतीचा अभिनव निर्णय
🚩 भव्य मिरवणुकीची वैशिष्ट्ये:
🔥 मशाल रॅली
🥁 हलगी व ढोल पथक
💃 मुलींचे लेझीम पथक
🐪 उंट, 🐎 घोडे आणि बैलगाडी देखावे
🎭 बाबासाहेब, रमाई, गाडगेबाबा यांचे जिवंत देखावे
🎺 पारंपारिक बँड वादन
🕖 वेळ: सकाळी ७ ते १२
📍 ठिकाण: नांदेड
👉 “महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता सर्वांसाठी जयंती” — हा या उपक्रमाचा मुख्य संदेश
#AmbedkarJayanti #NandedNews #BabasahebAmbedkar #UnityInDiversity #DJFreeJayanti SocialHarmony NandedUpdates JayantiCelebration
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    39 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.