लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : अन्यायाविरुद्ध शब्दांचे शस्त्र उगारणारा जनतेचा साहित्यसम्राट- प्राचार्य भांडेकर श्री.संजय भांडेकर प्राचार्य भारत माध्यामिक व उच्च माध्यमिक शाळा रिसोड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या जयंतीनिमित्त निमित्त दिलेले गोषवारा "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या ओजस्वी ओळी आजही समाजमनाला जागृत करतात. या ओळींचे निर्माते, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक किंवा शाहीर नव्हते, तर ते शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना शब्द देणारे युगपुरुष होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार आणि साहित्य पुन्हा नव्याने स्मरणात आणणे ही काळाची गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. अत्यंत गरिबी, उपेक्षा आणि जातीय विषमतेचा सामना करत त्यांनी आयुष्याची वाटचाल केली. औपचारिक शिक्षणाची संधी मिळाली नसतानाही त्यांनी जीवनालाच आपली शाळा बनवले. समाजातील अन्याय, भूक, दारिद्र्य, श्रमिकांचे हाल आणि माणुसकीचा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला. त्याच अनुभवांना त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून अमर केले. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला नवे सामाजिक भान दिले. त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केला. त्यांच्या लेखणीतून साकारलेली "फकिरा" ही कादंबरी मराठी साहित्याचा मैलाचा दगड ठरली. अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या सामान्य माणसाचा संघर्ष त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडला की आजही ती कादंबरी प्रेरणादायी मानली जाते. अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते परिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी कामगार, शेतकरी, दलित, भटके-विमुक्त, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या भावना साहित्याच्या केंद्रस्थानी आणल्या. त्यांच्या शाहिरीने असंख्य लोकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या विचारांवर महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा ठसा होता. समता, बंधुता, न्याय आणि मानवता ही मूल्ये त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजापर्यंत पोहोचवली. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण मानवतेचे लेखक ठरतात. आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही सामाजिक विषमता, बेरोजगारी, अन्याय आणि भेदभावाचे प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. अशा वेळी अण्णाभाऊंचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या साहित्याचा अभ्यास म्हणजे समाजातील वास्तव समजून घेण्याचा आणि परिवर्तनाची प्रेरणा मिळवण्याचा मार्ग आहे. दुर्दैवाने, अनेकदा आपण त्यांच्या जयंतीला केवळ पुष्पहार अर्पण करून औपचारिकता पूर्ण करतो. प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे वाचन, संशोधन आणि आचरण हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या साहित्याचे वाचन अभियान राबविणे ही काळाची गरज आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील अजरामर व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या शब्दांनी लाखो वंचितांना जगण्याची नवी उमेद दिली. त्यांच्या लेखणीने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आणि माणुसकीचा संदेश दिला. अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून, समतेच्या समाजाची नव्याने शपथ घेण्याचा दिवस आहे. त्यांच्या विचारांचा दीप समाजमनात सतत प्रज्वलित राहिला, तरच त्यांच्या कार्याला खरी अभिवादन ठरेल.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम1