बेलगावमध्ये पाणीटंचाईवरून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; महिलेने टॉवरवर चढून केला निषेध चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आज दि 11 मे ला 12 वाजता गावातील महिलांचा संताप उफाळून आला. महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा घेराव घातला. आंदोलनादरम्यान एका महिलेने तहसील कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बेलगाव गावात मागील काही दिवसांपासून नळयोजना विस्कळीत झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असून अनेक वेळा रिकाम्या हंड्यांसह परतावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. वारंवार ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
बेलगावमध्ये पाणीटंचाईवरून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; महिलेने टॉवरवर चढून केला निषेध चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आज
दि 11 मे ला 12 वाजता गावातील महिलांचा संताप उफाळून आला. महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा घेराव घातला. आंदोलनादरम्यान एका महिलेने तहसील कार्यालयाच्या मागील टॉवरवर चढून निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बेलगाव गावात मागील काही दिवसांपासून नळयोजना
विस्कळीत झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत असून अनेक वेळा रिकाम्या हंड्यांसह परतावे लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. वारंवार ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
- अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.1
- प्रयागराजमधील नवाबगंज येथे एका तरुणीने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अचानक उंच टॉवरवर चढून गोंधळ निर्माण केला. घटनास्थळी जमलेली गर्दी आणि पोलिसांकडून तिला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा घटनांमध्ये अलीकडे वाढ झाल्याने हा 'टावर ट्रेंड' चर्चेचा विषय ठरला आहे.1
- वर्धा जिल्ह्यात मांस विक्रीच्या अनेक दुकानांवर मोठी कारवाई करण्यात आली. अनेक तास चाललेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात संशयित मांस जप्त करण्यात आले असून अनेक व्यापारी फरार झाले आहेत.1
- उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.1
- पोटावर पाय देणारा महामार्ग नकोच; अध्यादेश जाळून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप. यूट्यूब चॅनेलवर live maharashtra digital सर्च करा *महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी आत्ताच “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा 🙏🏼* *जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा 📱 9860046900*1
- बिहारमधील पाटण्यात एक अनोखे सलून सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पूर्वी एटीएम असलेले हे ठिकाण आता केशकर्तनालय म्हणून सुरू झाले आहे. बाहेरून एटीएमसारखे दिसणाऱ्या या आगळ्यावेगळ्या बदलामुळे परिसरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.1
- सद्भाव यात्रेद्वारे 'द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान' उघडण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून संपूर्ण देशाला सद्भावनेने एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.1
- वर्धा जिल्ह्यात एका पूजेदरम्यान गॅस सिलेंडर अचानक संपले. ३००० रुपये देऊनही गॅस उपलब्ध झाला नाही, ज्यामुळे कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे परिसरातील गरीब कुटुंबांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1