logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आमने गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे भागवत सप्ताह अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

8 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
8 hrs ago

आमने गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे भागवत सप्ताह अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोला खिरपुरी बुद्रूक (ता. बाळापूर) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभामध्ये मृत माकड आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या माकडाला कुत्र्याने चावा घेतलेला असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 📍 काय आहे नेमकी घटना? खिरपुरी बु. येथील सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्येला ज्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या जलकुंभात आज मृत माकड तरंगताना दिसले. हेच दूषित पाणी संपूर्ण गावाला पुरवण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. *कुत्र्याने घेतला होता माकडाचा चावा! टाकीत आढळलेल्या मृत माकडाला कुत्र्याने चावा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे संसर्गजन्य आजार किंवा रेबीजचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. *पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा 'अज्ञात' इसमावर संशय याबाबत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने सांगितले की, "मी दोन दिवसांपूर्वीच टाकी स्वच्छ केली होती आणि त्यावर लोखंडी झाकणही होते." त्यामुळे हे कृत्य एखाद्या अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. *आरोग्य तपासणीची मागणी "प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन खिरपुरी येथील नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात." -आकाश दांदळे (युवा नेते)
    1
    अकोला 
खिरपुरी बुद्रूक (ता. बाळापूर) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभामध्ये मृत माकड आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या माकडाला कुत्र्याने चावा घेतलेला असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
📍 काय आहे नेमकी घटना?
खिरपुरी बु. येथील सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्येला ज्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या जलकुंभात आज मृत माकड तरंगताना दिसले. हेच दूषित पाणी संपूर्ण गावाला पुरवण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
*कुत्र्याने घेतला होता माकडाचा चावा!
टाकीत आढळलेल्या मृत माकडाला कुत्र्याने चावा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे संसर्गजन्य आजार किंवा रेबीजचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे.
*पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा 'अज्ञात' इसमावर संशय
याबाबत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने सांगितले की, "मी दोन दिवसांपूर्वीच टाकी स्वच्छ केली होती आणि त्यावर लोखंडी झाकणही होते." त्यामुळे हे कृत्य एखाद्या अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
*आरोग्य तपासणीची मागणी
"प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन खिरपुरी येथील नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात."
-आकाश दांदळे (युवा नेते)
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन* शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की ,सन 2024 ,2025 व 2026 वर्षातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई खात्यावर आलेली नाही याबाबत बाधित शेतकऱ्यांचे पुनर्लोकन करून त्या वर्षाची यादी शासनाच्या निदर्शनात आणून द्यावी व आताची 2026 वर्षाचे पंचनामे झाले असून सदर शेतकऱ्यांना प्रतीक्षेत न ठेवता त्वरित रब्बी हंगामाचे पिके मका ,ज्वारी, गहू ,हरभरा या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याचे काम करावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुंबळे, सुनील कोळी, शिवलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज*
    1
    *महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की ,सन 2024 ,2025 व 2026 वर्षातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई खात्यावर आलेली नाही याबाबत बाधित शेतकऱ्यांचे पुनर्लोकन करून त्या वर्षाची यादी शासनाच्या निदर्शनात आणून द्यावी व आताची 2026 वर्षाचे पंचनामे झाले असून सदर शेतकऱ्यांना प्रतीक्षेत न ठेवता त्वरित  रब्बी हंगामाचे पिके मका ,ज्वारी, गहू ,हरभरा या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याचे काम करावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुंबळे, सुनील कोळी, शिवलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
*भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज*
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.
    1
    उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष
अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार
भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी
विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो.
परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा
भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात.
पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित
या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
स्थानिकांचे मत
> “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.”
श्रद्धा आणि परंपरेचा संगम
भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    6 hrs ago
  • Post by Aditya
    1
    Post by Aditya
    user_Aditya
    Aditya
    Farmer हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    10 hrs ago
  • Post by Aditya
    1
    Post by Aditya
    user_Aditya
    Aditya
    Farmer हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    4
    हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.