प्राथमिक आरोग्य केंद्र कापडशिंगी येथे 'सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC) प्रशिक्षणाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र कापडशिंगी येथे 'सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा' (CPHC) प्रशिक्षणाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर वर हिंगोली, ( दि. २५ ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सेनगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापडशिंगी येथे करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा प्रशिक्षण संघाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले, जनरल फिजिशियन डॉ. नारायण भालेराव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. रामहरी बेले तसेच जिल्हा प्रशिक्षण संघाच्या शाखा सदस्य शोभा पवार, ज्योती बांगर व नंदा चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य व कार्यक्षमता उंचावणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर-उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेविका आरोग्य सेवक, आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यास ग्रामीण आरोग्य सेवेत अमुलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. गाव पातळीवरच जास्तीत जास्त आजारांवर उपचार करणे आणि अनावश्यक रेफरल्स टाळणे म्हणजेच "Resolve more, Refer less" हे सूत्र प्रभावीपणे अंमलात आणण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले. गावात माता मृत्यू व बाल मृत्यू दर शून्य ठेवणे, टी.बी., उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांचे वेळेत स्क्रिनिंग करणे आणि समुदायाशी जवळीक साधून गृहभेटी व आरोग्य शिबिरे आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात आला. सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेचे १३ प्रमुख घटक: या प्रशिक्षण सत्रात १३ मूलभूत घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले: गरोदरपण, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी: गरोदर महिलांची वेळेवर नोंदणी, नियमित तपासण्या, सुरक्षित संस्थात्मक प्रसूती आणि प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची योग्य काळजी. नवजात व अर्भक आरोग्य सेवा: जन्मानंतरची तत्काळ काळजी, त्वरित स्तनपान, लसीकरण आणि कुपोषण व संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण. बालक व किशोरवयीन आरोग्य: बालकांची वाढ व विकासाचे निरीक्षण, पोषण सुधारणा आणि किशोरवयीन आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन. कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य: सुरक्षित मातृत्वासाठी कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता, समुपदेशन आणि RII/STI वर उपचार. संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन: क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही यांसारख्या आजारांचे active screening, त्वरित उपचार व सर्वेक्षण. सामान्य व किरकोळ आजारांवर उपचार: ताप, सर्दी, खोकला, अतिसार यांसारख्या आजारांवर स्थानिक पातळीवरच मानक प्रोटोकॉलनुसार उपचार. असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण (NCD): मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोगाचे नियमित स्क्रिनिंग व जीवनशैलीत सकारात्मक बदल. डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य: दृष्टीदोष, मोतीबिंदू व श्रवणदोषांचे प्राथमिक टप्प्यात निदान व आवश्यक उपचार. मौखिक आरोग्य (Oral Health): दातांची स्वच्छता, मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती. वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर: ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांचे नियमित व्यवस्थापन आणि असाध्य आजार असलेल्या रुग्णांना वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी मानसिक व वैद्यकीय आधार. आपत्कालीन वैद्यकीय सेवा: अपघात, हृदयविकार व श्वसनाच्या समस्यांवर तत्काळ प्राथमिक उपचार आणि रुग्णवाहिका यंत्रणेचे सक्षमीकरण. मानसिक आरोग्य सेवा: नैराश्य, ताणतणाव व व्यसनाधीनता यावर प्राथमिक पातळीवर ओळख, समुपदेशन व योग्य मार्गदर्शन. योग व आयुष पद्धती: निरोगी जीवनशैलीसाठी योग, आयुर्वेद व होमिओपॅथीचा पूरक उपचार म्हणून वापर व प्रसार. संवाद कौशल्य, सकारात्मक देहबोली आणि प्रभावी नेतृत्व गुणांचा वापर करून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व रुग्णस्नेही बनवण्याचा संकल्प या प्रशिक्षणाद्वारे करण्यात आला. या प्रशिक्षणाला समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा वर्कर उपस्थित होते

- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.1
- 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes1
- परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन1
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2