राष्ट्रसंतांचे विचार जगाला तारक - डॉ. श. नु. पठाण -६ वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रसंतांचे विचार जगाला तारक - डॉ. श. नु. पठाण -६ वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचा समारोप नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचारच जगाला तारू शकतात असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. श. नु. पठाण यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन व विचारधारा विभागाच्या वतीने आयोजित ६ वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ. पठाण बोलत होते. औषधी निर्माणशास्त्र विभागाच्या डॉ. ऐ. के. डोरले सभागृहात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू डॉ. श. नु. पठाण, राष्ट्रधर्म प्रचार समिती आजीवन प्रचारक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ नांदुरा येथील संचालक आचार्य हरिभाऊ वेरुळकर, संमेलनाध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे, अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज जगाला सर्वतोपरी आवश्यकता असून ते विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे डॉ. पठाण पुढे बोलताना म्हणाले. जगात भीषण, भयावह, महायुद्धाची परिस्थिती सुरू असताना माणूस म्हणून जगण्याची शक्ती महाराजांचे साहित्य देते. मी स्वतः महाराजांच्या साहित्याचा पाईक आहे. त्यांच्या साहित्याचा स्वीकार केल्यानेच माझी ओळख निर्माण झाली, असे डॉ. पठाण म्हणाले. आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याने समाजाची जडणघडण झाली आहे. आजच्या युवा पिढीने ही घडण स्वीकारली पाहिजे आणि त्यातूनच त्यांचे जीवन सुंदर बनू शकते, असा अनमोल विचार व्यक्त केला. या संमेलनात दोन परिसंवाद घेण्यात आले. यातील दुसरा परिसंवाद 'राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रसंतांची भूमिका व युवकांकडून अपेक्षा' या विषयावर घेण्यात आला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी मराठी भाषा विद्यापीठ, अमरावती येथील अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे हे होते. वक्ते म्हणून डॉ. अरविंद देशमुख आणि श्री. अरविंद राठोड यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंताना अपेक्षित असलेले राष्ट्र मानवाच्या नैतिकतेतून निर्माण होऊ शकते, असे विचार डॉ. अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले, तर श्री. अरविंद राठोड यांनी वं. महाराजांना अपेक्षित असलेला युवक सत्य-शील आणि नेहमीच उद्योगी असणारा अपेक्षित होता आणि असाच तरुण आपल्या देशात घडावा, असा संदेश ते नेहमीच देत असत, असे व्याख्यानातून सांगितले. अध्यक्ष डॉ. कोमल ठाकरे यांनी राष्ट्रसंतांच्या नैतिक मूल्यांचा विचार आपल्या भाषणातून मांडला. युवकांनी व्यसनाकडे न वळता राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावे, हा बहुमोल विचार अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मांडला. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले तर आभार डॉ. देवमन कामडी यांनी मानले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अध्यासनात कॅन्सरची प्राथमिक तपासणी एचसीजी कॅन्सर सेंटर नागपूरने केली. साईनाथ ब्लड बँक, नागपूरच्या मदतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. संमेलनाकरिता विचारधारेचे आजी-माजी विद्यार्थी, गुरुदेवप्रेमी आणि महाराजांचे साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1