logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बालाजी क्यादरकुंटेचा राष्ट्रीय एकता शिबिरात सहभाग उदगीर (एल पी उगीले ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक बालाजी क्यादरकुंटे याने राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला. तामिळनाडूतील स्वामी विवेकानंद आर्ट सायन्स वुमन्स कॉलेज, विरचीपल्लायम ता. संकगीरी, जि. सालेम येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. देशातील विविध राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. शिबिरादरम्यान राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक विविधता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जनजागृती आणि नेतृत्व विकास या विषयांवर विविध उपक्रम, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी क्यादरकुंटे यांनी सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. या यशाबद्दल महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे व डॉ. निळकंठ वगशेट्टे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी बालाजी क्यादरकुंटे यांचे अभिनंदन करून भविष्यातही राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरणा दिली.

5 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
1cf5d367-a138-43d7-a619-f28f6bbe70d6

बालाजी क्यादरकुंटेचा राष्ट्रीय एकता शिबिरात सहभाग उदगीर (एल पी उगीले ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक बालाजी क्यादरकुंटे याने राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला. तामिळनाडूतील स्वामी विवेकानंद आर्ट सायन्स वुमन्स कॉलेज, विरचीपल्लायम ता. संकगीरी, जि. सालेम येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला. देशातील विविध राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. शिबिरादरम्यान राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक विविधता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जनजागृती आणि नेतृत्व विकास या विषयांवर विविध उपक्रम, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी क्यादरकुंटे यांनी सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. या यशाबद्दल महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे व डॉ. निळकंठ वगशेट्टे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी बालाजी क्यादरकुंटे यांचे अभिनंदन करून भविष्यातही राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरणा दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
    1
    राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न
लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    1
    दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.
आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Santosh Dhañure Dhanure
    Santosh Dhañure Dhanure
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली
    1
    लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती
    7
    मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते
दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला
यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे
गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia
    1
    🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू
हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.
शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏
#सिरपल्ली
#हिमायतनगर
#शेतकरीसंकट
#आगघटना
#ग्रामीणवार्ता
#शासनमदत
#FarmerDistress
#मदतीचीगरज
#NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.
    1
    खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. 
लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.