“अवैध शस्त्र व जुगार व्यवसायाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची सलग धडक कारवाई” लातूर ( एल पी उगीले) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणे व बेकायदेशीर जुगार व्यवसायास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग धडक कारवाया करून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून घातक शस्त्रे, रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन व वाहने असा एकूण ₹५,८३,६००/- पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने नियोजनबद्धरीत्या पार पाडली. दिनांक १६/०२/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे २०.३० वा. नवीन रेणापुर नाका, शालीमार फंक्शन हॉल समोर, साई रोड, आर्वी येथे विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून असलेला इसम नामे गोविंद राजकुमार कांबळे (वय ३१ वर्षे, रा. नवरत्न नगर, साई रोड, आर्वी, ता. जि. लातूर) हा आढळून आला. त्याच्या कडून सुमारे २ फूट ३ इंच लांबीची, लाल रंगाच्या म्यानासह लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.सदर आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक १७/०२/२०२६ रोजी दुपारी १५.२० वा. जुना रेणापुर नाका, बस स्थानक क्र. २, लातूर येथे पुन्हा एकदा गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.राजेश सिताराम पवार (वय ३२ वर्षे, रा. राजीव नगर, लातूर) हा त्याच्या टाटा इंडिका व्हिस्टा (क्र. MH 43 X 7820) या लाल रंगाच्या कारमध्ये विनापरवाना लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला.त्याच्याकडून २ फूट ५ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. यावेळी तलवार व संबंधित वाहन असा अंदाजे ₹१,००,१००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक १६/०२/२०२६ रोजी रात्री २३.४५ वा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर येथे सार्वजनिक मोकळ्या जागेत “तिर्रट” नावाचा जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये खालील आरोपी जुगार खेळताना मिळून आले :अमोल रामराव हसनाळे (वय ३६ वर्षे, रा. ज्ञानेश्वर नगर, लातूर),जिलानी रहीमसाब तांबोळी (वय ६५ वर्षे, रा. बौद्ध नगर, लातूर),फरीद ईसाक शेख (वय २० वर्षे, रा. पाचपिर नगर, लातूर),अवधुत महादेव संन्मुखराव (वय २० वर्षे, रा. राजीव नगर, लातूर), सदाम मुस्ताक फारुकी (वय ४३ वर्षे, रा. महाराणा प्रताप नगर, लातूर) त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच पाच दुचाकी वाहने असा एकूण एकूण मुद्देमाल ₹५,८३,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच रवी कोंडीबा दोनगहु,राजेश पवार व दत्ता कांबळे हे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याच्या व बेकायदेशीर जुगार व्यवसायाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सक्त सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना शस्त्र बाळगणे हे गंभीर व दंडनीय गुन्हे असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध धंदा किंवा कायद्याच्या विरुद्ध कृती आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी व शांततामय वातावरण निर्मितीसाठी कटिबद्ध आहे.
“अवैध शस्त्र व जुगार व्यवसायाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची सलग धडक कारवाई” लातूर ( एल पी उगीले) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणे व बेकायदेशीर जुगार व्यवसायास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग धडक कारवाया करून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून घातक शस्त्रे, रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन व वाहने असा एकूण ₹५,८३,६००/- पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने नियोजनबद्धरीत्या पार पाडली. दिनांक १६/०२/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे २०.३० वा. नवीन रेणापुर नाका, शालीमार फंक्शन हॉल समोर, साई रोड, आर्वी येथे विनापरवाना लोखंडी तलवार
बाळगून असलेला इसम नामे गोविंद राजकुमार कांबळे (वय ३१ वर्षे, रा. नवरत्न नगर, साई रोड, आर्वी, ता. जि. लातूर) हा आढळून आला. त्याच्या कडून सुमारे २ फूट ३ इंच लांबीची, लाल रंगाच्या म्यानासह लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.सदर आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक १७/०२/२०२६ रोजी दुपारी १५.२० वा. जुना रेणापुर नाका, बस स्थानक क्र. २, लातूर येथे पुन्हा एकदा गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.राजेश सिताराम पवार (वय ३२ वर्षे, रा. राजीव नगर, लातूर) हा त्याच्या टाटा इंडिका व्हिस्टा (क्र. MH 43 X 7820) या लाल रंगाच्या कारमध्ये विनापरवाना लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला.त्याच्याकडून २ फूट ५ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. यावेळी तलवार व संबंधित वाहन असा अंदाजे ₹१,००,१००/- किमतीचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक १६/०२/२०२६ रोजी रात्री २३.४५ वा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर येथे सार्वजनिक मोकळ्या जागेत “तिर्रट” नावाचा जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये खालील आरोपी जुगार खेळताना मिळून आले :अमोल रामराव हसनाळे (वय ३६ वर्षे, रा. ज्ञानेश्वर नगर, लातूर),जिलानी रहीमसाब तांबोळी (वय ६५ वर्षे, रा. बौद्ध नगर, लातूर),फरीद ईसाक शेख (वय २० वर्षे, रा. पाचपिर नगर, लातूर),अवधुत महादेव संन्मुखराव (वय २० वर्षे, रा. राजीव नगर, लातूर), सदाम मुस्ताक फारुकी (वय ४३ वर्षे, रा. महाराणा प्रताप नगर, लातूर) त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच पाच दुचाकी वाहने असा एकूण एकूण मुद्देमाल ₹५,८३,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच रवी कोंडीबा दोनगहु,राजेश पवार व
दत्ता कांबळे हे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याच्या व बेकायदेशीर जुगार व्यवसायाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सक्त सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना शस्त्र बाळगणे हे गंभीर व दंडनीय गुन्हे असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध धंदा किंवा कायद्याच्या विरुद्ध कृती आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लातूर जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी व शांततामय वातावरण निर्मितीसाठी कटिबद्ध आहे.
- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1