Shuru
Apke Nagar Ki App…
कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।
Malave subhash
कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आमदार रोहित पवार यांनी वारकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत सरकारवर थेट निशाणा साधला आहे. या दूषित पाण्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि वारकऱ्यांना तातडीने शुद्ध पाणी पुरवण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.1
- उपराकार लक्ष्मण माने यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.1
- कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील 'सुरेश काका सराफ अँड सन्स' या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी हातचलाखी करत १ लाख ६९ हजार ६७१ रुपये किमतीचे १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केले आहेत. सोमवारी दिवसा घडलेली ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी खरेदीचा बहाणा करत दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले आणि अवघ्या दोन मिनिटांत ७२२ ग्रॅम वजनाचे पैंजण चोरून नेले. याप्रकरणी ओम सचिन कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे।2
- पाऊले पंढरीची वाट चालत असून, दिंडी पंढरपूरच्या वाटेने पुढे मार्गस्थ होत आहे.1
- बारामतीमध्ये आबालवृद्धांमध्ये अजितदादांची प्रचंड क्रेझ असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये काही मतिमंद मुले अजितदादांची तीव्रतेने आठवण काढताना दिसत आहेत. अजितदादांच्या आठवणीत या मतिमंद मुलांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आहे. या मुलांनी अत्यंत भावुक होऊन अजितदादांना परत येण्याची साद घातली आहे. "दादा.. लवकर या... बारामतीला तुमची गरज आहे" अशा शब्दांत या मतिमंद मुलांनी घातलेली भावनिक साद तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या काळजाला भिडली आहे.1
- कल्याण ज्वेलर्सच्या बारामती येथील शोरूमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री तब्बू बारामतीत आली आहे.1
- डॉ. रत्नाकर महाजन यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासमवेत घालवलेल्या काळातील आठवणींचे कथन केले आहे.1
- शिरूरमधील करडे गावात पिस्तुलातून गोळीबार करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना घटनेच्या ७२ तासांच्या आत अटक करण्यात शिरूर पोलिसांना मोठे यश आले आहे. करडे गावात १८ जुलै २०२६ च्या रात्री जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले होते. या धक्कादायक घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी या आरोपींची चौकशी सुरू केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत शिरूर पोलिसांच्या विशेष पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.2