logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वारकरी कोणी रत्न पुरस्कार व महांत पदवी दीक्षा प्रधान सोहळा उत्साहात *वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर *धरणगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 एप्रिल -“वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संतांच्या विचारांचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी राजकारण नको. येथे येताना मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदासजी महाराज होते.* पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य सुरू आहे, ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करतो असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. धरणगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र तरडे खुर्द येथे वारकरी परंपरेच्या भक्तीमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ह.भ.प. बाबुलाल सीताराम पाटील (नाना) यांना संत नामदेव खालसा आखाड्याचे प्रमुख हभप महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज यांच्या हस्ते महंत पदवी व वारकरी गुणीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. *यांची होती उपस्थिती* कार्यक्रमाला महंत प्रणवगिरी बाबाजी, महंत नागेशानंदजी, महंत योगी ऋषिनाथजी, हभप सौरभ महाराज, हभप नवनाथ महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गौप्रेमी गजानन वरसाडेकर, हभप गोविंद महाराज पाचोरा, हभप रुपचंद बाबा, हभप कौतिक महाराज लोणीकर, स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव संस्थानाधिपती निमगाव, हभप कृष्णा महाराज, हभप रमेश महाराज तसेच नाशिकहून आलेले विविध संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संत नामदेव खालसा आखाड्याच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हभप बाबुलाल नाना यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील हे पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर केवळ वारकरी, साधूसंत व कीर्तनकार मंडळी विराजमान होती. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन हभप प्रा. सी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आमरस-पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी तरडे येथील तरुण मित्रमंडळ, संत तानसेन भजनी मंडळ व महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

10 hrs ago
user_Gopal Sonawane
Gopal Sonawane
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
10 hrs ago
07f827ef-78a6-4c44-9efd-c4a296d2534e

More news from Jalgaon and nearby areas
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    12 hrs ago
  • शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    1
    शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    2
    माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    user_Samadhan More
    Samadhan More
    Dhule, Maharashtra•
    13 hrs ago
  • पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    1
    पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा
अजमेर | १९ एप्रिल २०२६
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली.
या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताची थरारक माहिती:
वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार
ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी)
बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील)
कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज)
बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे.
बचावकार्य आणि उपचार:
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशासनाची हालचाल:
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे.
आनंदाचा क्षण दु:खात बदलला
मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Subhash Suryavanshi
    1
    Post by Subhash Suryavanshi
    user_Subhash Suryavanshi
    Subhash Suryavanshi
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली
    1
    धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.