logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एटीएम कार्डची हातचलाखी करणारा आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एटीएम कार्डची हातचलाखी करणारा आरोपी जेरबंद! वर्ध्यात एटीएममध्ये हातचलाखी करून नागरिकांच्या खात्यातून पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे...! एटीएममधून पैसे काढताना ट्रान्झेक्शन पूर्ण झालं नसल्याचं भासवून नागरिकांची दिशाभूल करायची... हातचलाखीने त्यांचं एटीएम कार्ड घ्यायचं आणि त्याऐवजी दुसरं कार्ड देऊन पसार व्हायचं... त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे, अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. २ ऑगस्ट रोजी अमरावती येथील माधुरी गवई या वर्धा रेल्वे स्टेशन परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांची दिशाभूल करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. काही वेळातच त्यांच्या युको बँक खात्यातून तब्बल ४८ हजार रुपये पाच वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे काढण्यात आले. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जमशेद अली शौकत अली अशी पटली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक उत्तर प्रदेशातही रवाना झालं होतं. मात्र आरोपी घरी नसल्याने त्याचा शोध सुरूच होता. अखेर १६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून जमशेद अली याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्याने हा गुन्हा सावेज अली नावाच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीकडून ४८ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे मोटरसायकल, हेल्मेट आणि दोन एटीएम कार्ड, असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी हा अशाच प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्याकडून इतर जिल्ह्यांसह परराज्यातील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

2 hrs ago
user_Raviraj Ghume
Raviraj Ghume
वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago
d978cd1d-f56a-46f0-878f-ae60531cfb04

एटीएम कार्डची हातचलाखी करणारा आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एटीएम कार्डची हातचलाखी करणारा आरोपी जेरबंद! वर्ध्यात एटीएममध्ये हातचलाखी करून नागरिकांच्या खात्यातून पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे...! एटीएममधून पैसे काढताना ट्रान्झेक्शन पूर्ण झालं नसल्याचं भासवून नागरिकांची दिशाभूल करायची... हातचलाखीने त्यांचं एटीएम कार्ड घ्यायचं आणि त्याऐवजी दुसरं कार्ड देऊन पसार व्हायचं... त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे, अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. २ ऑगस्ट रोजी अमरावती येथील माधुरी गवई या वर्धा रेल्वे स्टेशन परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांची दिशाभूल करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. काही वेळातच त्यांच्या युको बँक खात्यातून तब्बल ४८ हजार रुपये पाच वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे काढण्यात आले. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची

8f4e412b-9bb7-466e-a59e-9d173539c18f

ओळख उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जमशेद अली शौकत अली अशी पटली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक उत्तर प्रदेशातही रवाना झालं होतं. मात्र आरोपी घरी नसल्याने त्याचा शोध सुरूच होता. अखेर १६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून जमशेद अली याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्याने हा गुन्हा सावेज अली नावाच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीकडून ४८ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे मोटरसायकल, हेल्मेट आणि दोन एटीएम कार्ड, असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी हा अशाच प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्याकडून इतर जिल्ह्यांसह परराज्यातील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra
    1
    भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh 
[16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा?
[16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues
@TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews
    1
    ================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================

 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥

  कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!

================================================================================

🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!

🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!

🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!

🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?

================================================================================
 ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡

 "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
 अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================

📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================

#PTNNews
================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================
💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥
कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!
================================================================================
🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!
🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!
🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!
🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?
================================================================================
⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡
"दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================
📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================
#PTNNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    1
    अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.