logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उमरी भाटेगाव येथील एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले शिवश्री नानाराव (एन.जी.) कल्याणकर यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण आणि समाजकारणाचा एक सुंदर संगम घडवून आणला आहे. तामसा येथील श्री शिवाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कोळी (ता. हदगाव) येथील माध्यमिक विद्यालयात विज्ञान शिक्षक आणि संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली असून ३० जून २०२६ रोजी ते वयोमानानुसार सेवामुक्त झाले. आई निलाबाई व वडील गंगाधरराव यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांच्या बळावर त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदानच केले नाही, तर त्यांच्या मनात जीवनमूल्यांची रुजवणूक करत समाज परिवर्तनाच्या चळवळीतही स्वतःला वाहून घेतले. युगनायक इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने मराठा सेवा संघाच्या चळवळीत सक्रिय झालेल्या कल्याणकर यांनी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर विविध पदे समर्थपणे सांभाळली आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यात संघटनेचे मजबूत जाळे उभे केले. सध्या ते केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय योगदानांपैकी एक म्हणजे नांदेड येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेले सुमारे साडेतीन हजार चौरस फुटांचे आणि तीन कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मुलींचे वसतिगृह होय, जिथे आज ग्रामीण भागातील सुमारे ११० मुली सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत. याशिवाय, नांदेड येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवात पारदर्शक ऑनलाईन वर्गणी गोळा करणे आणि उर्वरित निधी समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याची संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवली आहे. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांवर चालणाऱ्या कल्याणकर यांच्या या सामाजिक प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. सुनीता, फिजिओथेरपिस्ट असलेली मोठी मुलगी डॉ. अनुजा, पुण्यात कार्यरत असलेली दुसरी मुलगी अपूर्वा आणि परभणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा अनिकेत यांची मोलाची साथ लाभली आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांसह विविध सामाजिक कक्षांच्या उभारणीत आणि मराठा आरक्षण, शेतकरी व वंचित घटकांच्या न्याय मागण्यांसाठी ते सातत्याने आग्रही राहिले आहेत. त्यांच्या या यशस्वी सेवापूर्तीबद्दल लेखक पंडित पवळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी राजमाता जिजाऊंच्या चरणी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.

6 hrs ago
user_Arvind D. Patil
Arvind D. Patil
Hadgaon, Nanded•
6 hrs ago
8529a0f7-233d-4a87-bfd3-4f1c81117268

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उमरी भाटेगाव येथील एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले शिवश्री नानाराव (एन.जी.) कल्याणकर यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण आणि समाजकारणाचा एक सुंदर संगम घडवून आणला आहे. तामसा येथील श्री शिवाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कोळी (ता. हदगाव) येथील माध्यमिक विद्यालयात विज्ञान शिक्षक आणि संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली असून ३० जून २०२६ रोजी ते वयोमानानुसार सेवामुक्त झाले. आई निलाबाई व वडील गंगाधरराव यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांच्या बळावर त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदानच केले नाही, तर त्यांच्या मनात जीवनमूल्यांची रुजवणूक करत समाज परिवर्तनाच्या चळवळीतही स्वतःला वाहून घेतले. युगनायक इंजि. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने मराठा सेवा संघाच्या चळवळीत सक्रिय झालेल्या कल्याणकर यांनी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर विविध पदे समर्थपणे सांभाळली आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यात संघटनेचे मजबूत जाळे उभे केले. सध्या ते केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय योगदानांपैकी एक म्हणजे नांदेड येथे लोकसहभागातून

8e865424-beeb-4cbb-83ff-650e0d9e9c5a

उभारण्यात आलेले सुमारे साडेतीन हजार चौरस फुटांचे आणि तीन कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मुलींचे वसतिगृह होय, जिथे आज ग्रामीण भागातील सुमारे ११० मुली सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत. याशिवाय, नांदेड येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवात पारदर्शक ऑनलाईन वर्गणी गोळा करणे आणि उर्वरित निधी समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याची संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवली आहे. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांवर चालणाऱ्या कल्याणकर यांच्या या सामाजिक प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. सुनीता, फिजिओथेरपिस्ट असलेली मोठी मुलगी डॉ. अनुजा, पुण्यात कार्यरत असलेली दुसरी मुलगी अपूर्वा आणि परभणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा अनिकेत यांची मोलाची साथ लाभली आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांसह विविध सामाजिक कक्षांच्या उभारणीत आणि मराठा आरक्षण, शेतकरी व वंचित घटकांच्या न्याय मागण्यांसाठी ते सातत्याने आग्रही राहिले आहेत. त्यांच्या या यशस्वी सेवापूर्तीबद्दल लेखक पंडित पवळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी राजमाता जिजाऊंच्या चरणी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    1
    शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

"मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिंगोलीच्या सेनगाव येथे काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन वाढवण्याबाबत यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सेनगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
    1
    हिंगोलीच्या सेनगाव येथे काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन वाढवण्याबाबत यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सेनगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    2
    नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी नाल्यावरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये पुलाच्या कॉलममधील काँक्रीट हाताने आणि दगडाने सहज निघत असल्याचा दावा केला गेला आहे. यामुळे पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय बळावला आहे. या निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अभियंते आणि ठेकेदारांमध्ये कथित संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामात सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय झाला असून भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नागरिकांनी पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक (Quality Audit) चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि पुलाच्या सुरक्षिततेची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले पूल सुरक्षित आहेत का, की निकृष्ट कामामुळे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी नाल्यावरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये पुलाच्या कॉलममधील काँक्रीट हाताने आणि दगडाने सहज निघत असल्याचा दावा केला गेला आहे. यामुळे पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय बळावला आहे.

या निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अभियंते आणि ठेकेदारांमध्ये कथित संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामात सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय झाला असून भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी नागरिकांनी पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक (Quality Audit) चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि पुलाच्या सुरक्षिततेची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले पूल सुरक्षित आहेत का, की निकृष्ट कामामुळे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.