एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी... अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे 'भारतीय असंतोषाचे जनक' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक राजेश कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शिक्षिका स्मिता खैरनार यांनी दोन्ही थोर पुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला. विद्यार्थी प्रतिनिधी ओवी सोनवणे व अमृत दिवाणे यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व सामाजिक कार्य यावर अत्यंत प्रभावी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात शिक्षक राजेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "लोकमान्य टिळकांचे निर्भीड विचार आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुरोगामी साहित्य हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा." या प्रसंगी शिक्षक अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, सुशांत निकम, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, सुनिता वडे, शर्मिला पवार, खुशी वाडेकर, आरती राजपूत, दर्शना परदेशी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निलिमा देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका संस्कृती थोरे यांनी मानले.
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी... अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे 'भारतीय असंतोषाचे जनक' लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक राजेश कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शिक्षिका स्मिता खैरनार यांनी दोन्ही थोर पुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला. विद्यार्थी प्रतिनिधी ओवी सोनवणे व अमृत दिवाणे यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व सामाजिक कार्य यावर अत्यंत प्रभावी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात शिक्षक राजेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "लोकमान्य टिळकांचे निर्भीड विचार आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुरोगामी साहित्य हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा." या प्रसंगी शिक्षक अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, सुशांत निकम, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, सुनिता वडे, शर्मिला पवार, खुशी वाडेकर, आरती राजपूत, दर्शना परदेशी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निलिमा देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका संस्कृती थोरे यांनी मानले.
- 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया2
- आजचा दिवसच पिक विमा भरण्यासाठी आहे पिक विमा भरून घ्या जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन1
- सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी खुलताबाद तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा! "ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले. शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."1
- भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तसेच अनेक जण जखमी असल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..1