श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र सोहळ्याची शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराजांच्या ‘काल्याच्या किर्तनाने’ भक्तिमय सांगता... ----------- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सांगता प्रसंगी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य अमृततुल्य दहिहंडी कार्यक्रम अर्थात ‘काल्याच्या किर्तनाने’ उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या वेळी मोरेश्वर संस्थान कोळवाडीचे मठाधिपती हरिहर भारती महाराज, बबन महाराज मंझरीकर, भक्तिदास महाराज शिंदे ( बेलखंडी पाटोदा), रणजित महाराज शिंदे (नेकनुर) उपस्थित होते. किर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील — “तुझिये संगति! जाली आमुची निश्चिंत!, नाही देखिले ते मळे! भोग सुखाचे सोहळे!!, घरी ताकांचे सरोवर! येथे नवनीताचे पुर!!, तुका म्हणे आतां! आम्ही न वजो दवडितां!!” या अभंगाच्या माध्यमातून गोपाळ आणि भगवंतातील गोड संवादाचे रसाळ वर्णन केले. “भगवंताची संगत लाभल्यावर मन निश्चिंत होते. कोणती ही चिंता, अपेक्षा किंवा अपूर्णता उरत नाही. भोग आणि सोहळा यात फरक आहे; परंतु भगवंताच्या संगतीत सुखाचा केवळ भोग नव्हे, तर आनंदसोहळाच प्राप्त होतो,” असे ते म्हणाले. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपासून ते अवतारसमाप्तीपर्यंतच्या जीवन प्रवासावर प्रबोधन करत “हे विश्वच माझे घर” या तत्वज्ञानाचा गोड संदेश दिला. परमात्म्याचे नामस्मरण, समभाव आणि विश्वबंधुत्व हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत विविध विषयांवर नामांकित किर्तनकारांनी समाजप्रबोधन केले. बबन महाराज मंझरीकर (हवेली), रामहरी महाराज वायबसे (सावरगाव सोने), रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे (चकलंबा), रामकृष्ण महाराज रंधवे बापू (पाटोदा), प्रेमानंद शास्त्री महाराज (वृंदावन धाम), भागवताचार्य शंकर महाराज चिंचकर (बीड) तसेच कृष्णा महाराज शास्त्री (हैनाही महाराज संस्थान, गुंदेफळ, बुलढाणा) यांनी किर्तनसेवा दिली. पंचक्रोशीतील विविध गावांतील मृदुंगाचार्य, वारकरी व भजनी मंडळांच्या सहभागातून हरिजागर व प्रवचनांचे भरगच्च कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्र उत्सव कमिटी बेलगाव, बेलगाव तरुण मंडळ व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. किर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.1
- शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.4
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1