जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ २० एप्रिल २०२६ तालुक्यातील बोरणार गावाजवळ जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून आपल्या गावी परतत होता. बोरणार गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील आणि गजा कोळी यांनी त्याला अडविले. दोन्ही संशयितांनी प्रेम धनगर याला दुचाकीवरून खाली उतरवून जुन्या वादातून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळताच राकेश पाटील याने आपल्या जवळील धारदार चाकू काढून प्रेम धनगरच्या कमरेवर वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत प्रेम धनगर याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या घटनेला अवैध धंद्यांची किनार असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. बोरणार गावालगत काही ठिकाणी अवैध पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत असून, त्याठिकाणी झालेल्या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, काही अवैध धंदे चालक आणि पोलिस यांच्यातील साटेलोटे असल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1
- धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- Post by AQUEEL CABLE NETWORK1
- रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- मराठवाड्यात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा इशारा 🌩️ मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्वाचे मुद्दे: 30–40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना काही भागात जोरदार सरींची शक्यता तापमानात किंचित घट होणार कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचना: वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नका विजांच्या वेळी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा शेतकऱ्यांनी पिकांची आणि साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1