Shuru
Apke Nagar Ki App…
रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
Bharat 24Taas News
रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
More news from महाराष्ट्र and nearby areas
- LPG संकट की मार: सूरत से लौटने लगे मजदूर, स्टेशन पर मची अफरा-तफरी खबर: मिडिल-ईस्ट में जारी तनाव और उसके चलते बढ़े LPG संकट का असर अब भारत में भी साफ नजर आने लगा है। खासकर सूरत जैसे औद्योगिक शहरों में हालात बिगड़ते दिखाई दे रहे हैं। कई कंपनियों ने उत्पादन कम या बंद करना शुरू कर दिया है, जिसके चलते मजदूरों के सामने रोज़गार का संकट खड़ा हो गया है। रविवार को उधना रेलवे स्टेशन पर भारी भीड़ देखने को मिली। बड़ी संख्या में मजदूर अपने-अपने घर लौटने के लिए स्टेशन पहुंचे। उत्तर प्रदेश और बिहार जाने वाली ट्रेनों में सीट पाने के लिए हजारों लोगों की भीड़ उमड़ पड़ी। भीड़ को नियंत्रित करने के लिए सूरत पुलिस को लाठीचार्ज करना पड़ा, जिसके बाद स्टेशन पर भगदड़ जैसे हालात बन गए। इस घटना ने एक बार फिर मजदूरों की असुरक्षा और संकट के दौर में उनकी मजबूरी को उजागर कर दिया है। हालात को देखते हुए प्रशासन अलर्ट पर है, लेकिन अगर जल्द ही स्थिति नहीं सुधरी तो बड़े पैमाने पर पलायन और बढ़ सकता है।1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1
- जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती1
- पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.1
- जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.1
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1
- यवतमाळ प्रतिनिधी: बंजारा समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा सखोल अभ्यास करून “याडी” हे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिणारे अभ्यासू लेखक पंजाबराव चव्हाण यांनी त्यांच्या लेखनप्रवासाबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले. सनातन सारथी न्यूजचे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी बंजारा समाजाच्या जतन आणि संवर्धनावर भर दिला. पंजाबराव चव्हाण म्हणाले की, “याडी हे पुस्तक केवळ साहित्य नसून बंजारा समाजाचा इतिहास जपणारे एक दस्तऐवज आहे. समाजातील परंपरा, संस्कृती, रूढी आणि जीवनशैली पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.” त्यांनी सांगितले की, या पुस्तकासाठी त्यांनी विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा केली. मुलाखतीदरम्यान त्यांनी आजच्या पिढीने आपल्या मुळांचा विसर पडू नये, यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले. तसेच बंजारा समाजातील तरुणांनी शिक्षणासोबतच आपल्या इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रतिनिधी सुरज पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चव्हाण यांनी त्यांच्या पुढील साहित्यिक योजनांबद्दलही संकेत दिले. “समाजाच्या विविध अंगांवर आधारित आणखी संशोधनपर लेखन करण्याचा माझा मानस आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ही मुलाखत वाचकांसाठी बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा परिचय करून देणारी ठरली असून, “याडी” या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.1