logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मेहकर/बुलढाणा रीलच्या नादात मेहकर समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात,दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 25 प्रवासी जखमी* *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला

4 hrs ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
4 hrs ago

मेहकर/बुलढाणा रीलच्या नादात मेहकर समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात,दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू 25 प्रवासी जखमी* *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    1
    जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह
दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -
    1
    विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत
-
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    48 min ago
  • अकोला: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिकांना फटका, पाण्याची टंचाई तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
    1
    अकोला:
विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिकांना फटका, पाण्याची टंचाई
तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे.
येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शेतकऱ्यांचा संताप उफाळला ढोल-ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक; ‘मुक्काम ठोको’ आंदोलन सुरू
    1
    शेतकऱ्यांचा संताप उफाळला
ढोल-ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक; ‘मुक्काम ठोको’ आंदोलन सुरू
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    1
    जळगाव हायवेवर नांद्रा ते  हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    5 hrs ago
  • अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    1
    अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    user_शिवदास जामोदे
    शिवदास जामोदे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • गोव्यात खासदार अनिल बोंडे सहपत्नीक; फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी साधला थेट संवाद अनिल बोंडे हे सध्या गोवा येथे सहपत्नीक सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. लाईव्ह दरम्यान बोंडे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच आगामी कामकाजाबाबतही त्यांनी माहिती दिली. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाच कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला. त्यांच्या या लाईव्हला कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी कमेंटद्वारे आपली मते मांडली. राजकारणासोबतच वैयक्तिक क्षण शेअर करत संवाद साधण्याच्या त्यांच्या या पद्धतीचीही चर्चा होत आहे.
    1
    गोव्यात खासदार अनिल बोंडे सहपत्नीक; फेसबुक लाईव्हद्वारे  कार्यकर्त्यांशी साधला थेट संवाद
अनिल बोंडे हे सध्या गोवा येथे सहपत्नीक सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.
लाईव्ह दरम्यान बोंडे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच आगामी कामकाजाबाबतही त्यांनी माहिती दिली. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाच कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला.
त्यांच्या या लाईव्हला कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी कमेंटद्वारे आपली मते मांडली. राजकारणासोबतच वैयक्तिक क्षण शेअर करत संवाद साधण्याच्या त्यांच्या या पद्धतीचीही चर्चा होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पळवून लावले व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांना पळवून लावले
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली.
प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Ashish ingle
    1
    Post by Ashish ingle
    user_Ashish ingle
    Ashish ingle
    Ice skating club Barshitakli, Akola•
    5 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.