माना पोलिसांच्या हद्दीतील कुरूम गावातील गुटखा बनवणारे साहित्य ताब्यात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.

- अकोला खिरपुरी बुद्रूक (ता. बाळापूर) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभामध्ये मृत माकड आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या माकडाला कुत्र्याने चावा घेतलेला असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 📍 काय आहे नेमकी घटना? खिरपुरी बु. येथील सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्येला ज्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या जलकुंभात आज मृत माकड तरंगताना दिसले. हेच दूषित पाणी संपूर्ण गावाला पुरवण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. *कुत्र्याने घेतला होता माकडाचा चावा! टाकीत आढळलेल्या मृत माकडाला कुत्र्याने चावा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे संसर्गजन्य आजार किंवा रेबीजचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. *पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा 'अज्ञात' इसमावर संशय याबाबत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने सांगितले की, "मी दोन दिवसांपूर्वीच टाकी स्वच्छ केली होती आणि त्यावर लोखंडी झाकणही होते." त्यामुळे हे कृत्य एखाद्या अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. *आरोग्य तपासणीची मागणी "प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन खिरपुरी येथील नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात." -आकाश दांदळे (युवा नेते)1
- खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.1
- वरवट बकाल बस स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! महिला कंडक्टरची मुजोरी; "कलेक्टर-होम मिनिस्टर असला तरी फरक पडत नाही."1
- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.1
- प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का ! Purn Borse #paratwada1
- खामगाव : शहरातील जलंब रोडवरील वाडी परिसरात शुक्रवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एक वृद्ध शिवणकाम कारागीर व शेजारच्या इमारतीतील एक युवती जखमी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकापाठोपाठ तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अरुण अनोकार (७२), हे शिवणकाम करणारे कारागीर गंभीररीत्या भाजले. घटनेवेळी ते दुकानातील ग्राहकांचे कपडे आणण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली कादंबरी किरण आचार्य (१९) ही स्फोटाच्या धक्क्यामुळे खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, फॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमी दोघांनाही तत्काळ वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित हॉटेल अरुण कोलते यांच्या मालकीचे असल्याचे समजते. स्फोटामुळे हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, हिमांशू नाहर या युवकाची दुचाकीदेखील आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण पवार, पीएसआय राजेश गोमासे, संतोष गायकवाड व राम धामोळे घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन विभागाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, भाजप मीडिया सेलचे सागर फुंडकर, तहसीलदार सुनील पाटील व महावितरण तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.1
- वरवंट बकालमध्ये महिला कंडक्टरची अरेरावी; प्रवाशांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल*.1
- खामगांव वाडी येथे मोठी दुर्घटना 3 कमर्शियल सिलेंडर फुटून आर्या हॉटेल मध्ये लागली भिषण आग दोन वेक्ती गंभीर जखमी कोणतीही जिवीत हानी नाही1