Shuru
Apke Nagar Ki App…
परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का ! Purn Borse #paratwada
Purn borse
परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का ! Purn Borse #paratwada
- Gaurishankar Dhikarधारणी, अमरावती, महाराष्ट्रमै सभी पत्रकार अव न्यूज चैनल का आभार व्यक्त करता हूं कि मामला दबने नहीं दिया ।4 hrs ago
- आप का सपोर्टचिखलदरा, अमरावती, महाराष्ट्रright 101%7 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अकोला खिरपुरी बुद्रूक (ता. बाळापूर) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभामध्ये मृत माकड आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या माकडाला कुत्र्याने चावा घेतलेला असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 📍 काय आहे नेमकी घटना? खिरपुरी बु. येथील सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्येला ज्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या जलकुंभात आज मृत माकड तरंगताना दिसले. हेच दूषित पाणी संपूर्ण गावाला पुरवण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. *कुत्र्याने घेतला होता माकडाचा चावा! टाकीत आढळलेल्या मृत माकडाला कुत्र्याने चावा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे संसर्गजन्य आजार किंवा रेबीजचा धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. *पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा 'अज्ञात' इसमावर संशय याबाबत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने सांगितले की, "मी दोन दिवसांपूर्वीच टाकी स्वच्छ केली होती आणि त्यावर लोखंडी झाकणही होते." त्यामुळे हे कृत्य एखाद्या अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. *आरोग्य तपासणीची मागणी "प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन खिरपुरी येथील नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात." -आकाश दांदळे (युवा नेते)1
- *महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन* शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की ,सन 2024 ,2025 व 2026 वर्षातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई खात्यावर आलेली नाही याबाबत बाधित शेतकऱ्यांचे पुनर्लोकन करून त्या वर्षाची यादी शासनाच्या निदर्शनात आणून द्यावी व आताची 2026 वर्षाचे पंचनामे झाले असून सदर शेतकऱ्यांना प्रतीक्षेत न ठेवता त्वरित रब्बी हंगामाचे पिके मका ,ज्वारी, गहू ,हरभरा या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देण्याचे काम करावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष मंगेश कोळी, दिव्यांग प्रहार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम जुंबळे, सुनील कोळी, शिवलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज*1
- Post by Rohit Mitra3
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.1
- उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.1
- माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन नागपूर/उमरेड प्रतिनिधी नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.1
- Post by Rohit Mitra1
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- Post by RAJA news1