Shuru
Apke Nagar Ki App…
वरवट बकाल बस स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! महिला कंडक्टरची मुजोरी; "कलेक्टर-होम मिनिस्टर असला तरी फरक पडत नाही."
बुलढाणा माझा न्युज
वरवट बकाल बस स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! महिला कंडक्टरची मुजोरी; "कलेक्टर-होम मिनिस्टर असला तरी फरक पडत नाही."
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.1
- अजितदादांच्या विमानाचा अपघात; घटनास्थळी रोहित पवार, राजेंद्र पवार दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रोहित पवार आणि राजेंद्र पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी कार्यरत असून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.1
- उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.1
- कन्नड येथे होणाऱ्या विराट हिंदू सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे साधू संतांची विचार महत्वाचे असतात यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वं त्यांनी आव्हान या वेळी केले आहे1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.1
- मनमाड जंक्शनवर थरारक प्रकार; वेडसर व्यक्तीने रेल्वे वाहतूक ठप्प केली1
- खामगाव : शहरातील जलंब रोडवरील वाडी परिसरात शुक्रवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता एका हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एक वृद्ध शिवणकाम कारागीर व शेजारच्या इमारतीतील एक युवती जखमी झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकापाठोपाठ तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अरुण अनोकार (७२), हे शिवणकाम करणारे कारागीर गंभीररीत्या भाजले. घटनेवेळी ते दुकानातील ग्राहकांचे कपडे आणण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली कादंबरी किरण आचार्य (१९) ही स्फोटाच्या धक्क्यामुळे खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, फॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमी दोघांनाही तत्काळ वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित हॉटेल अरुण कोलते यांच्या मालकीचे असल्याचे समजते. स्फोटामुळे हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, हिमांशू नाहर या युवकाची दुचाकीदेखील आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण पवार, पीएसआय राजेश गोमासे, संतोष गायकवाड व राम धामोळे घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन विभागाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, भाजप मीडिया सेलचे सागर फुंडकर, तहसीलदार सुनील पाटील व महावितरण तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.1
- १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.2