logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

१४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! विद्यार्थ्याच्या हातात पुस्तकांऐवजी घागरी १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

3 hrs ago
user_Anil dandi
Anil dandi
Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
3 hrs ago
3fe96c18-daa6-4f38-b821-5a4655efa753

१४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! विद्यार्थ्याच्या हातात पुस्तकांऐवजी घागरी १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात

पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    1
    अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    user_शिवदास जामोदे
    शिवदास जामोदे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    52 min ago
  • १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    2
    १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! 
अकोला :
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.
या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे.
महागडे पाणी: जगायचे कसे?
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे.
रामभरोसे कारभार
लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत.
अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.
    1
    उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष
अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार
भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी
विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो.
परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा
भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात.
पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित
या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
स्थानिकांचे मत
> “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.”
श्रद्धा आणि परंपरेचा संगम
भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    4 hrs ago
  • खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.​प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत.​ या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.​प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती  व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत.​ या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    1
    अमानी प्रतिनिधी:
अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अमली पदार्थ तस्करांविरुद्ध अकोला पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शहरात धाड टाकून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज (मेफेड्रोन) जप्त केले होते. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या तस्कराला न्यायालयाने त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन बसस्थानका मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित इसम मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख (वय ३५ वर्षे) रा. मुंब्रा याला अटक करण्यात आली होती. त्याच्या कडून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते. त्याची बाजारपेठ किंमत साधारण १३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी दोन मोबाईल (किंमत २०,००० रुपये) असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके,पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव करीत आहेत.
    1
    'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अमली पदार्थ तस्करांविरुद्ध अकोला पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शहरात धाड टाकून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज (मेफेड्रोन) जप्त केले होते. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या तस्कराला न्यायालयाने त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन बसस्थानका मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित इसम मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख (वय ३५ वर्षे) रा. मुंब्रा याला अटक करण्यात आली होती. त्याच्या कडून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते. त्याची बाजारपेठ किंमत साधारण १३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी दोन मोबाईल (किंमत २०,००० रुपये) असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके,पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव करीत आहेत.
    user_शिवदास जामोदे
    शिवदास जामोदे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.