Shuru
Apke Nagar Ki App…
6महीने झाले तरी नाली बांधकाम पूर्ण झाले नाही न प अनपढ इंजिनीयर मुळे
Santosh Dhakulkar
6महीने झाले तरी नाली बांधकाम पूर्ण झाले नाही न प अनपढ इंजिनीयर मुळे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Santosh Dhakulkar1
- अमानी प्रतिनिधी: अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.1
- Post by Sharad Dayedar1
- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.1
- १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.2
- परतवाड्यातील प्रकार समोर कुणी आणला ? तुम्हाला माहिती आहे का ! Purn Borse #paratwada1
- *अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ* मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली.घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. *भगीरथ राजा 24 न्यूज *1
- 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अमली पदार्थ तस्करांविरुद्ध अकोला पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शहरात धाड टाकून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज (मेफेड्रोन) जप्त केले होते. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या तस्कराला न्यायालयाने त्याला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन बसस्थानका मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित इसम मोहम्मद शफीक मोहम्मद जहिर शेख (वय ३५ वर्षे) रा. मुंब्रा याला अटक करण्यात आली होती. त्याच्या कडून ६८.४३ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते. त्याची बाजारपेठ किंमत साधारण १३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी दोन मोबाईल (किंमत २०,००० रुपये) असा एकूण १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके,पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव करीत आहेत.1