मंठा तालुक्यात अवैध वाळू उत्खननावर आळा घालण्याची मागणी मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

- Post by Ramesh Mulgir1
- ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.1
- 17 तारखेला झालेल्या बीड शहरात मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती दरम्यान अरबाज पठाण यांचे भाषण1
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालन्यात खून, मृतदेह टाकला दरेगावच्या जंगलात, कैलास पवार (इंदेवाडी) असे मयताचे नाव1
- शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1