logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

1 hr ago
user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
    1
    खामगाव :  येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दरेगाव हादरले! जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    1
    दरेगाव हादरले! जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह
दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • प्रतिनिधी D.M लातूर — शहरात कथित हप्ता प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल चालकाने "हप्ता घेतात आणि माझा मालही पकडतात" असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी अचानक रेडसाठी आल्यावर हॉटेल चालकाने संतप्त प्रतिक्रिया दिली. "हप्ता घेतला जातो, आणि तरीही रेड टाकली जाते" असा आरोप करत चालकाने अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचेही दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे. जर व्हिडिओतील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
    1
    प्रतिनिधी D.M
लातूर — शहरात कथित हप्ता प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल चालकाने "हप्ता घेतात आणि माझा मालही पकडतात" असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी अचानक रेडसाठी आल्यावर हॉटेल चालकाने संतप्त प्रतिक्रिया दिली. "हप्ता घेतला जातो, आणि तरीही रेड टाकली जाते" असा आरोप करत चालकाने अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचेही दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे. जर व्हिडिओतील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer Soegaon, Aurangabad•
    7 hrs ago
  • अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पळवून लावले व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांना पळवून लावले
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली.
प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    1
    अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा  एकूण  1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ही कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे  ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.
    user_शिवदास जामोदे
    शिवदास जामोदे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.
    1
    माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • हनुमान नगरात हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड! हनुमान नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी किरकोळ वादातून हवेत गोळीबार करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपींची परिसरात धिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
    1
    हनुमान नगरात हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!
हनुमान नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी किरकोळ वादातून हवेत गोळीबार करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित आरोपींना अटक केली.
यानंतर पोलिसांनी आरोपींची परिसरात धिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.