Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! शिक्षकांची सहल ठरली काळरात्र ! व्हॅन दरीत कोसळली; ९ शिक्षकांचा मृत्यू - पहा भयानक व्हिडिओ ! तामिळनाडू राज्यातील वालपराई येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल २०२६) संध्याकाळी भीषण अपघात घडला. पर्यटकांची व्हॅन खोल दरीत कोसळल्याने ९ शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Ramesh Mulgir1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालन्यात खून, मृतदेह टाकला दरेगावच्या जंगलात, कैलास पवार (इंदेवाडी) असे मयताचे नाव1
- सेलूतील खून प्रकरणी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या1
- Post by Mohsin ahmed khan1
- जालना - अज्ञात व्यक्तीकडून निघृण खून; दरेगाव वन विभागाच्या जंगलात सापडला मृतदेह! जालना तालुक्यातील दरेगाव येथील वनविभागाच्या जंगल परिसरात आज (१९ एप्रिल) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली असून त्यांचा अज्ञात व्यक्तीकडून निघृण खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.1
- पाटोदा(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी हालचालींना अखेर वेग आला आहे. मुंबईतील नामांकित शिल्पकारांकडून तातडीने कोटेशन मागविण्यात आले असून, गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शंभुप्रेमींच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हा नियोजन अर्थसंकल्पात या स्मारकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी ही रक्कम अपुरी असल्याचे सांगत अधिक निधी उपलब्ध करून देऊन रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांची स्मारके उभारल्याशिवाय लोकार्पण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शंभुप्रेमींनी घेतली होती. या नंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चार वर्षे कोणती ही कामे झाली नाहीत. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुप्रेमींनी सातत्याने निवेदने व आंदोलनांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुंबईतील प्रख्यात शिल्पकार राजेंद्र शिरगावकर (विघ्नेश्वर आर्ट्स) यांना पत्र पाठवून प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेत एकूण सहा पुतळे उभारण्याचा ठराव पारित करण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्राँझ पुतळा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येकी ४ फूट अर्धाकृती ब्राँझ पुतळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा, लोकनेते सुंदरराव सोळंके यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा आंदोलनकर्त्यांनी लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मारकांचीही उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी असलेले शंभुप्रेमी डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, अशोक येडे, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, राहुल वायकर, संजय गोडसे, जयदत्त थोटे, युवराज मस्के, विठ्ठल बहिर, भागवत मस्के, गणेश मस्के, गणेश धोंडरे, राजेंद्र आमटे, नितिन सोनावणे,विजय लाटे सह आदींनी समाधान व्यक्त केले आहे.1
- हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.1