शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे बैठक हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Aditya1
- मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद1
- नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे1
- *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.3
- Post by Aditya1
- मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद1
- आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला. मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.1