logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परभणीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी,

9 hrs ago
user_Mohsin ahmed khan
Mohsin ahmed khan
Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
9 hrs ago

परभणीत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी,

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Aditya
    1
    Post by Aditya
    user_Aditya
    Aditya
    Farmer हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हिंगोली, दि. १७ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. वाढत्या तापमानात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४५६- २२१७०१ तर हिंगोली नगर परिषदेचा मदत कक्षाचा ०२४५६-२२३१०१:हा क्रमांक आहे. नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. घ्यावयाची काळजी : नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या पेयांचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत. काय टाळावे : दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. चहा, कॉफी व मद्यपान टाळावे. बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत. उष्माघात झाल्यास उपाय : एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
    1
    हिंगोली, दि. १७ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
वाढत्या तापमानात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४५६- २२१७०१ तर हिंगोली नगर परिषदेचा मदत कक्षाचा ०२४५६-२२३१०१:हा क्रमांक आहे. नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.
उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
घ्यावयाची काळजी :
नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या पेयांचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत.
काय टाळावे :
दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. चहा, कॉफी व मद्यपान टाळावे. बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत.
उष्माघात झाल्यास उपाय :
एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे.
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    1
    नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    3
    *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..*
AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत. तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?
    4
    ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे.
शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Aditya
    1
    Post by Aditya
    user_Aditya
    Aditya
    Farmer हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    4
    हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर, दि. 18 एप्रिल 2026. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
    4
    लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न.
लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली.
सुरू ॲप इन मराठी न्यूज.
लातूर, दि. 18 एप्रिल 2026.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.
याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.