उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली, दि. १७ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. वाढत्या तापमानात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४५६- २२१७०१ तर हिंगोली नगर परिषदेचा मदत कक्षाचा ०२४५६-२२३१०१:हा क्रमांक आहे. नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. घ्यावयाची काळजी : नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या पेयांचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत. काय टाळावे : दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. चहा, कॉफी व मद्यपान टाळावे. बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत. उष्माघात झाल्यास उपाय : एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

- Post by Aditya1
- हदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महिला विधेयकाच्या संदर्भात काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यामुळे हदगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवानेते शिवराज पाटील कोहळीकर, भास्कर दादा वानखेडे, सुदर्शन पाटील, बबनराव कदम, बाबुसराव कदम,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितलताई भांगे, अश्विनी गिरी,मनोज पांडे, राजू तावडे आदिसह हदगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे हादगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शने करून काँग्रेसचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.4
- एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी1
- hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,4315371
- Post by Mohsin ahmed khan1
- पंचमुखी वेअर हाऊस या फर्म चा प्रो.प्रा.रायचंद सखाराम कुंरगळ याने जालना मर्चंट बॅके सोबत करारनामा केला आहे ज्यात वेअर हाऊसचे मालक यांनी मालधारक कर्जदारांचा माल साठवुन घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या मालाच्या पावती वर संबंधीत मालधारकांचे नाव, माल गोडावुन मध्ये असल्या बाबतचा वेअर हाऊसचा मालाचा टॅग क्रमांक देणे, संबंधीत मालाला सुध्दा टॅग लावुन त्यावर पावती क्रमांक लिहने, मालधारकांनी माल ठेवल्या नंतर पंचमुखी वेअर हाऊसने दिलेल्या पावत्या आधारे संबधीत मालधारकांना जालना मर्चंट बँकेचे संबधीत शाखा कर्ज वितरीत करत होते. बँकेच्या न्यु मार्केट यार्ड जालना शाखा, भोकरदन शाखा, अंबड शाखा, देऊळगाव राजा, गेवराई शाखा, मंठा शाखा, या शाखेतील मालधारक यांनी त्यांचा शेतमाल पंचमुखी वेअर हाऊस प्रो रायचंद सखाराम कुंरगळ ए.पी.एम.सी. न्यु मार्केट यार्ड ॲग्रो, प्रोसींग झोन प्लॉट क्रं. 3 सर्वे नं. 181 जालना यांचेकडे नियमा प्रमाणे जमा केला असल्याच्या पावत्या पंचमुखी वेअर हाऊसचे प्रो.प्रा. कुंरगळ यांनी दिल्यामुळे त्या आधारे जालना मर्चंट बॅकेने 177 कर्ज मालधारकाना कर्ज दिलेले आहे. त्यापैकी 133 खातेदार यांनी कर्ज न भरता थकबाकीदार झालेले आहेत. त्यांना बॅकेने वेळोवेळी नोटीस देवुन त्यांचेकडे असलेल्या कर्जाची परतफेड करण्या बाबत वारंवार सांगीतले मात्र ते कर्ज भरत नसल्याने बॅकेने बॅकेच्या नियमा प्रमाणे संबधीत मालधारक कर्जदार यांचे मालाचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया केली जाते. बॅकेच्या नियमा प्रमाणे संबंधीत कर्जदार यांचे मालाचा लिलाव प्रक्रिया सुरू केली असता संबधीत मालधारक कर्जदार आणी पंचमुखी वेअर हाऊस चे प्रो.प्रा. श्री. रायचंद सखाराम कुंरगळ यांनी अडथळा करुन लिलाव होवु दिला नाही. बँकेने पंचमुखी वेअर हाऊस येथे जावुन मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करण्या करीता वेअर हाऊसचे मालक रायचंद सखाराम कुरंगळ यांना स्वत: भेटुन संबधीत थकबाकीदार कर्जधारकांचा जमा माल पाहणी करणे आहे. तो माल दाखवा असे म्हणाल्याने त्यांनी आज नाही नंतर दाखवतो असे म्हणुन दोन महीन्या पासुन मालधारक कर्जधारकांचा जमा असलेला तारण माल दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबधीत कर्जदार यांचा माल गोडावुनमध्ये नसल्याचे समजले. त्यावरुन बॅकेचे महाव्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस पोलीस ठाणे चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे 23 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना मार्फत चालु आहे. गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्या संबंधी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांचे आदेश असल्याने गुन्हयातील आरोपीचा शोध घेत गोपणीय माहीती अधारे काल रात्री उशीराने आरोपी नामे रायचंद सखाराम कुरंगळ, रा.सिंदखेड राजा ता सिंदखेड राजा जि.बुलढाणा, ह.मु. चौधरीनगर मंठा रोड जालना. हा जालना येथुन फरार झाल्याची माहिती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथुन निघुन आरोपीचा त्रांत्रीक विश्लेषणा आधारे पाठलाग करत आरोपी हा पोलीस ठाणे श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हद्दीमध्ये असल्याची खात्री झाल्याने आरोपीस श्रीगोंदा येथुन ताब्यात घेऊन गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आज रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालया समोर हजर करण्यात आले मा.न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर आरोपीची 8 दिवसाची पिसीआर मंजुर केली आहे. गुन्हयाचा सखोल तपास चालु असुन यामध्ये ज्या अरोपीचा सहभाग आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आणि पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली.1
- Post by Aditya1