लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर, दि. 18 एप्रिल 2026. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर, दि. 18 एप्रिल 2026. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा
भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख
पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमाला
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
- 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo1
- नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे1
- महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विरोधकांवर टीका1
- hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,4315371
- Post by Mohsin ahmed khan1
- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत. तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?4
- तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- सरकारने रद्द केलेल्या 5 टक्के आरक्षणावर पुनर्विचार करावा शेख अनिस सर यांचे मत.बीड शहरात 17 तारखेला एल्गार मोर्चा काढण्यात आला होता1