वेलतूरात हर घर जल चा नारा फोल, पाण्याची टाकी शोभेची वास्तू वेलतूरात ‘हर घर जल’चा फोल गाजावाजा; टाकी उभी पण नळ कोरडेच जल जीवन मिशनची कामे अर्धवट; महिलांना अजूनही पाण्यासाठी वणवण कुही(शरद शहारे) केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना वेल तूर सह कुही तालुक्यात अक्षरशः कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र समोर येत आहे. “हर घर जल”चा नारा देत मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या; मात्र वेलतूर सह अनेक गावांत आज अडीच- तिन वर्षीनतंरी नळ कोरडेच असून घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. खेड्यापाड्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून टाक्या, विहिरी आणि पाईपलाईनची कामे हाती घेण्यात आली. काही मोजक्या गावांमध्ये योजना यशस्वी ठरली असली तरी बहुसंख्य गावांमध्ये केवळ टाक्यांचे बांधकाम करून काम अर्धवट सोडल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, वेलतूर येथे नविन पाईप लाईन टाकण्याच्या नावावर मध्यभागातून सिमेंट रस्ते फोडून ती तशीच सोडून देण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतच काम थांबले आहे. काही टाक्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नव्याने खोदलेल्या विहिरींचीही गुणवत्ता संशयास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही ठिकाणी जुन्याच विहिरींवर अवलंबून राहून योजना राबवली जात असल्याने अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. “महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवणार” अशी घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात महिलांनाच अजूनही लांबवरून पाणी आणावे लागत आहे. पाच-सहा वर्षे उलटूनही नळातून पाणी मिळाले नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “नळ बसवले, टाक्या उभारल्या; पण पाणी कधी येणार?” असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “योजना लवकरच पूर्ण होईल आणि सर्वांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल,” असे आश्वासन देण्यात येत आहे. दुसरीकडे, ठेकेदार मात्र निधीअभावी कामे रखडल्याचे सांगत आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना तालुक्यासह जिल्ह्यात निष्फळ ठरत असल्याचे दिसते, काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्ध स्रोत आहेत तिथून पाणी देण्यात आले आहे. टाक्याचे निकृष्ट बांधकाम केले असून या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मोठा संशय आहे. एकीकडे योजनेचा गाजावाजा आणि दुसरीकडे अपूर्ण कामे या विसंगतीमुळे जल जीवन मिशनचा कुही तालुक्यात बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष नळातून पाणी कधी येणार, याचीच प्रतीक्षा आहे. हर घर जल' (जल जीवन मिशन) ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणे आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात ही कामे मंजूर असूनही प्रत्यक्षात नळाद्वारे पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. रखडलेल्या कामांची मुख्य कारणे: निधीची कमतरता (Funding Issues): महाराष्ट्र सरकारला ऑक्टोबर २०२४ पासून केंद्र सरकारकडून जल जीवन मिशनसाठीचा निधी मिळालेला नाही, ज्यामुळे अनेक कामे थंडावली आहेत प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी: कामांना मंजुरी मिळाल्यानंतरही, जमिनीची उपलब्धता नसणे, स्थानिक लोकांचा विरोध, आणि विविध विभागांकडून आवश्यक परवानग्या मिळण्यास होणारा उशीर यामुळे कामे लांबणीवर पडत आहेत . कंत्राटदारांची दिरंगाई: अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी वेळेत कामे पूर्ण न केल्यामुळे, राज्य सरकारने सुमारे ६७ कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केले असून त्यांना दंडही ठोठावला आहे अपूर्ण पायाभूत सुविधा: काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या टाक्या (Water Tanks) उभारल्या गेल्या आहेत, परंतु पाणी साठवणूक आणि वितरण पाईपलाईनचे काम अजूनही अर्धवट आहे पाण्याच्या स्रोतांची कमतरता: अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली असली, तरी योग्य पाण्याचा स्रोत (Water Source) उपलब्ध नसल्यामुळे किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावल्यामुळे नळ कोरडेच राहत आहेत. सद्यस्थिती (महाराष्ट्र): ५१,५६० हून अधिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर असल्या तरी, त्यापैकी निम्म्याहून अधिक कामे पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत . राज्य सरकारने स्वतःच्या स्तरावर निधी उपलब्ध करून कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही ऑक्टोबर २०२४ नंतर केंद्रीय निधीअभावी कामांचा वेग मंदावला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी गावपातळीवर पाणी समित्यांची सक्रियता, कंत्राटदारांवर कडक कारवाई आणि राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, जेणेकरून ही योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात ग्रामीण भागातील लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवेल अशी भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे.
वेलतूरात हर घर जल चा नारा फोल, पाण्याची टाकी शोभेची वास्तू वेलतूरात ‘हर घर जल’चा फोल गाजावाजा; टाकी उभी पण नळ कोरडेच जल जीवन मिशनची कामे अर्धवट; महिलांना अजूनही पाण्यासाठी वणवण कुही(शरद शहारे) केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना वेल तूर सह कुही तालुक्यात अक्षरशः कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र समोर येत आहे. “हर घर जल”चा नारा देत मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या; मात्र वेलतूर सह अनेक गावांत आज अडीच- तिन वर्षीनतंरी नळ कोरडेच असून घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. खेड्यापाड्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून टाक्या, विहिरी आणि पाईपलाईनची कामे हाती घेण्यात आली. काही मोजक्या गावांमध्ये योजना यशस्वी ठरली असली तरी बहुसंख्य गावांमध्ये केवळ टाक्यांचे बांधकाम करून काम अर्धवट सोडल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, वेलतूर येथे नविन पाईप लाईन टाकण्याच्या नावावर मध्यभागातून सिमेंट रस्ते फोडून ती तशीच सोडून देण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतच काम थांबले आहे. काही टाक्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नव्याने खोदलेल्या विहिरींचीही गुणवत्ता संशयास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही ठिकाणी जुन्याच विहिरींवर अवलंबून राहून योजना राबवली जात असल्याने अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. “महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवणार” अशी घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात महिलांनाच अजूनही लांबवरून पाणी आणावे लागत आहे. पाच-सहा वर्षे उलटूनही नळातून पाणी मिळाले नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “नळ बसवले, टाक्या उभारल्या; पण पाणी कधी येणार?” असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “योजना लवकरच पूर्ण होईल आणि सर्वांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल,” असे आश्वासन देण्यात येत आहे. दुसरीकडे, ठेकेदार मात्र निधीअभावी कामे रखडल्याचे सांगत आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना तालुक्यासह जिल्ह्यात निष्फळ ठरत असल्याचे दिसते, काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्ध स्रोत आहेत
तिथून पाणी देण्यात आले आहे. टाक्याचे निकृष्ट बांधकाम केले असून या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मोठा संशय आहे. एकीकडे योजनेचा गाजावाजा आणि दुसरीकडे अपूर्ण कामे या विसंगतीमुळे जल जीवन मिशनचा कुही तालुक्यात बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष नळातून पाणी कधी येणार, याचीच प्रतीक्षा आहे. हर घर जल' (जल जीवन मिशन) ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणे आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात ही कामे मंजूर असूनही प्रत्यक्षात नळाद्वारे पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. रखडलेल्या कामांची मुख्य कारणे: निधीची कमतरता (Funding Issues): महाराष्ट्र सरकारला ऑक्टोबर २०२४ पासून केंद्र सरकारकडून जल जीवन मिशनसाठीचा निधी मिळालेला नाही, ज्यामुळे अनेक कामे थंडावली आहेत प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी: कामांना मंजुरी मिळाल्यानंतरही, जमिनीची उपलब्धता नसणे, स्थानिक लोकांचा विरोध, आणि विविध विभागांकडून आवश्यक परवानग्या मिळण्यास होणारा उशीर यामुळे कामे लांबणीवर पडत आहेत . कंत्राटदारांची दिरंगाई: अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी वेळेत कामे पूर्ण न केल्यामुळे, राज्य सरकारने सुमारे ६७ कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केले असून त्यांना दंडही ठोठावला आहे अपूर्ण पायाभूत सुविधा: काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या टाक्या (Water Tanks) उभारल्या गेल्या आहेत, परंतु पाणी साठवणूक आणि वितरण पाईपलाईनचे काम अजूनही अर्धवट आहे पाण्याच्या स्रोतांची कमतरता: अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकली असली, तरी योग्य पाण्याचा स्रोत (Water Source) उपलब्ध नसल्यामुळे किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावल्यामुळे नळ कोरडेच राहत आहेत. सद्यस्थिती (महाराष्ट्र): ५१,५६० हून अधिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर असल्या तरी, त्यापैकी निम्म्याहून अधिक कामे पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत . राज्य सरकारने स्वतःच्या स्तरावर निधी उपलब्ध करून कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही ऑक्टोबर २०२४ नंतर केंद्रीय निधीअभावी कामांचा वेग मंदावला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी गावपातळीवर पाणी समित्यांची सक्रियता, कंत्राटदारांवर कडक कारवाई आणि राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, जेणेकरून ही योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात ग्रामीण भागातील लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवेल अशी भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे.
- कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Mahesh RamRaj PandRam3
- जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh1
- Post by Pitam Parjapati1
- खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos1